सांगोल्डातून चारचाकी पळवणाऱ्या चौघांना गुजरात येथे अटक

अधीक्षक शोभित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वरी पोलिसांनी गोवा-महाराष्ट्र सीमेवरील सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग तपासले.
सांगोल्डातून चारचाकी पळवणाऱ्या चौघांना गुजरात येथे अटक
Thief Arrested Dainik Gomantak

पर्वरी : सांगोल्डा येथील चारचाकी चोरून नेणाऱ्या चौघांना पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पर्वरी पोलिसांनी शिताफीने गुजरात येथे अटक केली.

Thief Arrested
गाड्या चोरणारी टोळी जेरबंद; राजस्‍थानात आवळल्‍या मुसक्‍या

22 मे रोजी दुपारी 1 वाजता पर्वरी पोलिस स्थानकात अजित विरजी यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार रात्री सांगोल्डा येथे आशीर्वाद बंगल्यासमोर उभी करून ठेवलेली 10 लाख रुपयांची चारचाकी अज्ञातांनी चोरली. अधीक्षक शोभित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वरी पोलिसांनी गोवा-महाराष्ट्र सीमेवरील सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग तपासले असता ती गाडी राजस्थानमधील बडनेरात असल्याचे समजले. राजस्थान येथे गेल्यावर संशयित गुजरातला गेल्याचे समजताच पोलिसांनी कमरेज-गुजरात येथून सुरत पोलिसांच्या मदतीने 10 रोजी संशयितांना अटक केली.

Thief Arrested
'मिका असो की मायकल; कायदा हा सर्वांना समान'

अटक केलेल्यांमध्ये श्रवन कुमार (24), राम जीवन (29), अरविंदकुमार बिश्नोई (32), कृष्णकुमार माली (24) यांचा समावेश असून, सर्व राजस्थानमधील आहेत. पोलिसांनी त्यांना अटक करून सात दिवसाचा रिमांड घेतला आहे. त्यांच्याकडून एक चारचाकी, 5 गाडीच्या डुप्लिकेट चाव्या, 37 हजार रुपये व ग्लास कटर जप्त करण्यात आला आहे. शोभित सक्सेना, एसडीपीओ विश्वेश्वर कर्पे, निरीक्षक अनंत गावकर, उपनिरीक्षक सीताराम मळीक, हवालदार संदीप परब, शिपाई महादेव नाईक व शिपाई प्रज्योत परब यांनी तपास केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com