घरमालकाच्या घरात चोरी करून पळालेल्या चोरट्यास चोवीस तासांत अटक

मुळ परळ- मुंबई येथील परंतु सध्या ग्रेड- मरड, सांळगाव येथे वास्तव्यास असलेल्या दिलजान नेविल वाडीया (48) यांनी सांळगाव पोलिसांत सोमवारी संध्याकाळी या चोरीसंबंधात तक्रार दाखल केली होती.
घरमालकाच्या घरात चोरी करून पळालेल्या चोरट्यास चोवीस तासांत अटक
सांळगाव चोरीप्रकरणात मांद्रे येथून ताब्यात घेतलेल्या संशयित भुषण जाधव यांच्यासहित सांळगाव पोलिस पथक : संतोष गोवेकर. Dainik Gomantak

सांळगाव (Sancoale) येथे घरमालकाच्या घरात दीड लाखांची चोरी करून गोव्याबाहेर (Goa) पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या सातारा -महाराष्ट्र येथील भुषण जितेंद्र जाधव (24) याच्या सांळगाव पोलिसांकडून चोवीस तासांच्या आत मुसक्या आवळण्यात आल्या. दरम्यान, संशयित भुषणच्या ताब्यातील रियेल्म कंपनीचा महागडा मोबाईल संच, महिद्रा बैंकेचे एटीएम कार्ड तसेच महिद्रा कंपनीच्या आलिशान गाडीची चावी आणी रोख रक्कम मिळून अंदाजे दीड लाखांचा ऐवज पोलिसांकडून जप्त करण्यात आल्याची माहिती  सांळगावचे पोलिस निरीक्षक मिलींद भुईंबर यांनी दिली.

सविस्तर व्रुत्तानुसार, मुळ परळ- मुंबई येथील परंतु सध्या ग्रेड- मरड, सांळगाव येथे वास्तव्यास असलेल्या दिलजान नेविल वाडीया (48) यांनी सांळगाव पोलिसांत सोमवारी संध्याकाळी या चोरीसंबंधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत सांळगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक मिलिंद भुईंबर यांनी उप-निरीक्षक उल्हास खोत, सहाय्यक निरीक्षक अनिल केरकर, कॉ. संदेश आरोसकर, विजय पाळणी तसेच भगवंत गवंडी यांच्यासोबतीने त्वरीत कारवाई करतांना सावंतवाडा- मांद्रे येथील एका खाजगी हॉटेलमधून संशयित भुषण जाधवला तो तेथून पळ काढण्याच्या तयारीत असतांनाच शिताफीने ताब्यात घेतले.

दरम्यान, संशयित जाधवच्या ताब्यातील चोरीस गेलेल्या सर्वच्या सर्व वस्तू तसेच 77 हजार 500 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. दरम्यान, सांळगाव पोलिस स्थांनकाचे सहाय्यक निरीक्षक अनिल केरकर निरीक्षक मिलींद भुईंबर तसेच उप-अधिक्षक गजानन प्रभुदेसाई तसेच उत्तर गोवा पोलिस अधिक्षक शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.