पर्यटकांच्या बॅगा पळवणारे चोर अखेर गजाआड

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 6 मार्च 2021

मांद्रे येथील किनाऱ्यावरून काल पाच मार्च रोजी पर्यटकांची एक बॅग चोरीस गेली होती. 

पेडणे : पर्यटक समुद्रात उतरल्यानंतर त्यांनी किनार्‍यावर ठेवलेल्या बॅगा पळवणाऱ्या चोरट्यांना पेडणे पोलिसांनी अटक केली आहे. मांद्रे येथील किनाऱ्यावरून काल पाच मार्च रोजी पर्यटकांची एक बॅग चोरीस गेली होती. 

पेडर रोड मुंबई येथील किरण वाही हे पर्यटक म्हणून गोव्यात आले होते त्यांनी आपली बॅग किनार्‍यावर ठेवून ते समुद्रात उतरले होते मात्र परत येऊन पाहतात तो त्यांची बॅग कोणीतरी गायब केली होतीद्य. बॅगेत दोन आयफोन, स्पीकर, एअरपॉड, पैशाचे पाकीट आणि दहा हजार रुपये रोख होते. त्यांनी या चोरीबाबत पेडणे पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडे केलेल्या चौकशीतून एका संशयित स्कूटरचा शोध लागला. ती स्कूटर घेऊन फिरणाऱ्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे चोरीचा मुद्देमाल सापडला.

गोवा पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक संतोष सावंतांची आत्महत्या

दोघेही चोरटे हे पर्यटक बनून गोव्यात आले होते. राजस्थानमधील चंदन साहू व विशाल साहू अशी या चुलत बंधूंची नावे आहेत.ते या स्कूटरवर फिरून चोर्‍या करत होते अशी कबुली त्यांनी पोलिसात दिली आहे. पोलीस निरीक्षक जिवबा दळवी आणि पोलीस उपनिरीक्षक संजीव खानोलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

संबंधित बातम्या