Panjim मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; दिवसाढवळ्या फोडले फ्लॅट

पणजीत व परिसरामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
panjim Theft
panjim TheftDainik Gomantak

राजधानी पणजीतील सांतिनेज परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रात्री तसेच दिवसाढवळ्याही दुकाने, फ्लॅट फोडण्याचे प्रकार घडत असल्‍याने पणजी पोलिसांची झोप उडाली आहे. या चोऱ्यांमुळे पणजीत व परिसरामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

सांतिनेज येथील कांपाल परिसरात काल व आज समोरासमोर असलेल्या इमारतींमधील तळमजल्यावर बंद असलेले फ्लॅट चोरट्यांनी फोडले. ही इमारत जुनी असल्याने फ्लॅटमालक ते बंद ठेवून इतर ठिकाणी राहतात. त्यामुळे चोरट्यांच्‍या हाती काहीच लागले नाही. हे दोन्ही फ्लॅट एकाच चोरट्याने फोडल्‍याचा संशय आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, मात्र त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने धारेदोरे सापडले नाहीत.

panjim Theft
Goa Congress Rebel : दीर्घ प्रतिक्षेनंतर काँग्रेसमधील बंडखोरांची अमित शहा, नड्डांसोबत चर्चा

गेल्या आठवड्यात सांतिनेज येथील 'बाझिलोजिम' इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्‍या मिनी मार्केटचे शटर वाकवून व कुलुपे तोडून आतली रोकड पळविण्‍यात आली होती. ही चोरी पहाटे 4 ते 5 या वेळेत झाल्‍याचे तेथील सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाले होते. विशेष म्‍हणजे हे दुकाने रस्त्याच्या बाजूला भरवस्‍तीत असूनही चोरट्यांनी चोरी केल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत.

panjim Theft
Goa IIT: विरोधात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरु

आज दुपारी पुन्हा काल दिसलेला तरुण सांतिनेज परिसरात रेंगाळत असलेला एका महिलेला दिसला. तिने त्याला या ठिकाणी काय करतोस असे विचारले असता, जेवणानंतर विश्रांतीसाठी आल्याचे त्याने सांगितले. मात्र काही वेळाने रस्त्यापलीकडील इमारतीच्या तळमजल्यारील दुसऱ्या बंद फ्लॅटमध्‍ये त्‍याने चोरी केली.

panjim Theft
Goa Drugs : ड्रग्ज दलालांच्या शोधार्थ हैदराबाद पोलिस गोव्यात

सलग दोन दिवस साधली संधी: कांपाल येथील दोन फ्लॅटमधील चोरी करणाऱ्या चोरट्याला तेथील काही लोकांनी पाहिले आहे. काल एक परप्रांतीय तरुण या इमारतीच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या बाकड्यावर बसला होता. तो दुपारच्या वेळी खूप वेळ बसून होता. नंतर संध्याकाळी या इमारतीच्या तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये चोरी करून तो पसार झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com