पर्वरीतून चोरट्यांनी ‘एटीएम’ मशीनच पळवले!

Thieves snatched 'ATM' machine at parwari
Thieves snatched 'ATM' machine at parwari

पर्वरी- आबिर्णे -सुकुर येथील युनियन बँक ऑफ इंडियाचे काल रात्री अज्ञात चोरट्यांनी ‘एटीएम’ मशीन चोरून त्यातील अंदाजे १९.३८ लाख रुपये घेऊन लंपास झाले, अशी तक्रार शाखा व्यवस्थापक प्रभावती हेगडे यांनी पर्वरी पोलीस स्थानकात दिली आहे.

आबिर्णे-सुकुर येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या (पूर्वीची कॉर्पोरेशनन बँक) एटीएम खोलीत चोरट्यांनी प्रवेश करण्यापूर्वी  सीसीटीव्ही जोडणी तोडून टाकली. त्यानंतर आत प्रवेश केला. एटीएम मशीन जागेवरून काढले व घेऊन गेले. त्या चोरट्यांनी अंदाजे  दोनशे मीटर अंतरावर असलेल्या चर्चेच्या मागच्या बाजूच्या मैदानावर जाऊन ते मशीन फोडले. पोलिसांनी पंचनामा केला आहे. पोलिसांनी ठसे तज्ज्ञ, तसेच श्वानपथक घटना स्थळी पाचारण केले. अंदाजे  ३ / ४ चोरटे असू शकतात, असा अंदाज पोलिसांनी केला आहे. उपनिरीक्षक प्रतीक भट यांनी पंचनामा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com