डिचोली येथील सातेरी मंदीर चोरट्यांनी फोडले

दोन लाखांहून अधिक किंमतीचे दागिने चोरट्यांनी लांबवले
 Saturi Devi Temple
Saturi Devi TempleDainik Gomantak

डिचोली: पंचायत निवडणुकीच्या धामधुमीत सर्वण-डिचोली येथील श्री सातेरी देवीचे मंदिर फोडून सुवर्णालंकारासह दोन लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती मिळाली. गुरुवारी (ता.11) रात्री ते शुक्रवारी पहाटे दरम्यान चोरीचा ही घटना घडल्याचा अंदाज आहे.

(Thieves stole two lakh jewelry at Saturi Devi Temple in Bicholim)

 Saturi Devi Temple
Goa Congress : गोव्यात पोलीस विभागाचे भगवेकरण सुरु; काँग्रेसचा निशाणा

सविस्तर वृत्त असे की डिचोली येथील सातेरी देवीचे मंदीर चोरट्यांनी काल रात्री फोडले आहे. मंदिराच्या गर्भकुडीच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील देवीच्या अंगावरील मंगळसूत्र, नथ ह्या सुवर्णालंकारासह समया आदी वस्तू लंपास केल्या. याबाबत माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता चोरट्यांनी सर्व दागिने लांबवल्याचे समोर आले आहे.

 Saturi Devi Temple
Goa Panchayat Election Result : पंचायत निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी; विजयी उमेदवारांचा जल्लोष!

मंदिरासभोवताली असलेल्या देवतांच्या काही घुमट्यातील मिळेल त्या घंटा आणि समयाही लंपास केल्या. फंडपेटीला मात्र हात लावला नाही. आज सकाळी चोरीचा हा प्रकार पुजाऱ्याच्या लक्षात आला. देवस्थान समितीने पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. मंदिरात सीसी टिव्ही कॅमेरा बसविण्यात आले असले तरी तो नादुरुस्त अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तपासात अडथळा निर्माण झाला आहे. पंचायत निवडणुकीच्या धामधुमीत ही चोरी झाल्याने उलटसुलट चर्चा सुरु आहे.

School Merger : शाळा खासगीकरणाचा प्रस्ताव नसल्याचा हळर्णकरांचा दावा

School Merger : राज्यातील प्राथमिक शाळांच्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही. मात्र, विरोधकांकडून विनाकारण अपप्रचार करण्यात येत आहे. परंतु सूज्ञ जनतेने अशा अपप्रचाराला बळी न पडता राज्यातील शिक्षणाचा स्तर आणि क्षमता वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी शापोरा येथे केले.

वार्षिक परंपरेनुसार, नारळी पंचमीनिमित्त बार्देशातील शापोरा येथील मच्छीमार जेटीवर समुद्रात नारळ सोडल्यानंतर मंत्री हळर्णकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शापोरा बोट असोसिएशनचे अध्यक्ष बलभीम मालवणकर, हणजूण-कायसूवचे माजी सदस्य सुरेंद्र गोवेकर, आसगाव-बादेचे माजी सरपंच गोकुळदास नाईक, सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत परब आणि स्थानिक मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बलभीम मालवणकर यांनी स्थानिक मच्छीमारांच्या समस्या मंत्री हळर्णकर यांच्यासमोर मांडल्या. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे हळर्णकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com