उसगावात झाला तिसरा अपघात

दैनिक गोमंतक
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

उसगाव भागात गेल्या दोन दिवसांपासून जीवघेणे अपघात होत असतानाच आज (शुक्रवारी) तिसऱ्या दिवशीही टाकवाडा - बाराजण उसगाव येथे दुचाकी व कारगाडीच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात सकाळी आठच्या सुमारास घडला.

फोंडा : उसगाव भागात गेल्या दोन दिवसांपासून जीवघेणे अपघात होत असतानाच आज (शुक्रवारी) तिसऱ्या दिवशीही टाकवाडा - बाराजण उसगाव येथे दुचाकी व कारगाडीच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात सकाळी आठच्या सुमारास घडला. 

टाकवाडा - उसगाव येथील बगल रस्त्यावरून फोंड्याच्या दिशेने येणाऱ्या जीए12 ए 0051 या क्रमांकाच्या कारगाडीची धडक जीए05 एन 0967 या क्रमांकाच्या दुचाकीला बसली. या अपघातात दुचाकीस्वार चरण च्यारी (धावशिरे - उसगाव) हा रस्त्यावर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. त्याला लागलीच इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

फोंडा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून उसगाव पंचायतक्षेत्रात अपघातांचे सत्र सुरू असून दोन दिवसांपूर्वी बाराजण - उसगावात ट्रक - दुचाकीच्या ठोकरीत दोघेजण मरण पावले होते. हा अपघात कसा झाला, त्याचे कोडे लोकांना पडले असून पोलिसांनी तपास करताना ट्रकला ठोकर बसल्यानेच अपघात झाल्याचा निष्कर्ष काढला आहे.

तर दुसऱ्या दिवशी काल (गुरुवारी) खुरसाकडे - उसगाव येथे जीपगाडी व दुचाकीच्या अपघातात बोळकर्णे - साकोर्डा येथील दुचाकीचालक मृत्युमुखी पडला होता. उसगाव - धारबांदोडा भागातील वाहतुकीवर पोलिसांनी तसेच वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या