तिसऱ्या आंतरराष्ट्रीय निती परिषदेसाठी 'रिसर्च डॉ. नंदकुमार कामत' यांना निमंत्रण

गोवा विद्यपिठाच्या सायकोलॉजी विभागाचे रिसर्च स्कॉलर डॉ. नंदकुमार कामत यांना तुर्की येथील अनकारा शहरात होणाऱ्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय निती परिषदेला निमंत्रीत करण्यात आले आहे.
तिसऱ्या आंतरराष्ट्रीय निती परिषदेसाठी 'रिसर्च  डॉ. नंदकुमार कामत' यांना निमंत्रण
Third International Conference was attended by Dr. Nandkumar Kamat from Goa UniversityDainik Gomantak

पणजी: गोव्यात विविध विषयावर चौफेर लेखन करणारे वैज्ञानीक व गोवा विद्यपिठाच्या सायकोलॉजी विभागाचे रिसर्च स्कॉलर डॉ. नंदकुमार कामत (Dr. Nandkumar Kamat) यांना तुर्की येथील अनकारा शहरात होणाऱ्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय निती परिषदेला (Third International Conference) निमंत्रीत करण्यात आले आहे.

Third International Conference was attended by Dr. Nandkumar Kamat from Goa University
हॉटेलसाठी झाडे तोडून व टेकड्या कापून बेकायदेशीर रस्ता करण्याचा प्रयत्न

इन्स्टिट्यूट ऑफ इकोनॉमिक डेव्हलपमेंट ॲण्ड सोशल रिसर्च या संस्थेने आयोजित केलेल्या या परिषदेत परवा ता.११ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या पहिल्या परिसंवदाचे अध्यक्षपद डॉ. नंदकुमार कामत हे भूषवणार आहेत. यात गोवा विद्यापिठाचे सायकोलॉजी विभागाचे प्रोफेसर संज्योत पै वेर्णेकर व बायोटेक्नोलॉजी विभागाच्या प्रोफेसर सविता केरकर यांचाही सहभाग आहे. आहे गोवा विद्यापिठाचे वरील दोन्ही प्रोफेसर व वैज्ञानिक डॉ. कामत ‘ कोविड १९ च्या काळात निर्माण झालेले बायोएथीक विषय व पुढील काळातील आव्हाने ‘ या विषयावर बोलणार असून डॉ. कामत हे वरील विषयावर यावेळी प्रबंध सादर करणार आहेत.

Third International Conference was attended by Dr. Nandkumar Kamat from Goa University
सर्व प्रकल्प डिसेंबरपूर्वीच पूर्ण करणार: मुख्यमंत्री सावंत

या परिषदेत भारतातर्फे गोवा विद्यापिठाची निवड झालेली असून तुर्की, फिलीफाईन्स, भारत,, पाकिस्तान, इराण , इंडोनेशिया, दक्षिण अफ्रिका, श्रीलंका आदी एकूण १९ देशाचे प्रतिनिधी , वैज्ञानिक, प्रोपेसर या परिषदेत भाग घेणार आहेत. भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी गोवा विद्यापिठातील डॉ. कामत, प्रो. पै वेर्णेकर व प्रो. केरकर यांना मिळाल्यामुळे गोव्यासाठी ही अभिमानाची घटना ठरली आहे.

Related Stories

No stories found.