Corona Updates: राज्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा उद्यापासून; वाचा कुणाला मिळणार 

दैनिक गोमन्तक
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

उद्या सोमवार 1 मार्चपासून राज्यात 60 वर्षापेक्षा अधिक व 45 ते 59 या दरम्यान वयाच्या इतर आजार असलेल्या नागरिकांना कोरोनाची लस देण्याची सर्व ती तयारी पूर्ण झाली आहे.

उद्या सोमवार 1 मार्चपासून राज्यात 60 वर्षापेक्षा अधिक व 45 ते 59 या दरम्यान वयाच्या इतर आजार असलेल्या नागरिकांना कोरोनाची लस देण्याची सर्व ती तयारी पूर्ण झाली आहे. राज्यातील सुमारे 37 केंद्रांवर कोरोना लसीकरण मोहीम सुरू होईल.

गोवा नगरपालिका निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी विरोधक एकवटले

लाभार्थ्यांनी लसीकरणास येताना त्यांचे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही शासकीय ओळखपत्र  घेऊन जवळच्या सरकारी रुग्णालयात जावे. लसीकरणासाठी येणाऱ्यांची सुरुवातीला नोंदणी केली जाईल. 45 ते 59 या वयोगटातील लोकांनी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या प्रमाणानुसार त्यांना असलेल्या इतर आजारासंबंधी डॉक्टरांकडून प्रमाणपत्र आणावे. या प्रमाणपत्रावर संबंधित व्यक्तीचे छायाचित्र (फोटो) असणे आवश्यक आहे. दोन्ही गटांसाठी शासकीय पोर्टल खुले झाल्यानंतर कोविड पोर्टलवरही सर्वांची ऑनलाइन नोंदणी करता येईल.

गोव्यात गेल्या 24 तासात 50 रूग्ण ‘कोरोना’मुक्त; 61 नव्या रूग्णांची नोंद

गोवा मेडिकल कॉलेज, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, म्हापसा आणि फोंडा उपजिल्हा रुग्णालय, सार्वजनिक आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्रे आदी सर्व 37 केंद्रांवर ही लसीकरण मोहीम राबविली जाईल. प्रत्येक केंद्राला दुसऱ्या डोससह दररोज 100 डोसचे लक्ष्य दिले गेले आहे. खासगी रुग्णालयांना लस देण्याची परवानगी देण्याबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. खासगी रुग्णालयांशी लवकरच बैठक होईल. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या लसीचे शुल्क 250 रुपये ठरवून दिले आहे. सरकारी रुग्णालयात दिली जाणारी लस विनामूल्य आहे.

संबंधित बातम्या