कोरोनाची तिसरी लाट घातक असणार नाही; डॉ. बांदेकर

गोवा राज्य कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेची सामना करण्यासाठी सिध्द आहे.
कोरोनाची तिसरी लाट घातक असणार नाही; डॉ. बांदेकर
Corona UpdateDainik Gomantak

पणजी: गोवा राज्य कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेची सामना करण्यासाठी सिध्द आहे. 90 टक्के तयारी झालेली आहे. मात्र एकूणच अभ्यानंतर असे दिसून आले आहे की कोरोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेईतकी घातक असणार नाही. असे प्रतिपादन गोवा वैद्यकिय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी केले.

Corona Update
Goa: पहिली सायबर फॉरेन्सिक लॅब कर्यान्वित

डॉ. बांदेकर हे आज मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी आले असता पत्रकारांनी त्यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत विचारले असता त्यांनी वरील प्रतिपादन केले. राज्यात सर्वच ठिकाणी गर्दी वाढत असल्याबद्दल विचारले असता कोरोना नियंत्रण एक्सस्पर्ट समितीचे प्रमुख असलेले डॉ. बांदेकर म्हणाले की सर्व व्यवहार सुरळीत झालेत. लोकानीही आता कोरोना सोबत जगण्यास सुरु केले आहे. मात्र लोकांनी कोरोना नियमांचे पालन करावे व फिरावे, कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी. असे आपले आवाहन असल्याचे डॉ. बांदेकर म्हणाले. जे लोक लस घेत नाहीत त्यांच्यावर काय कारवाई करणार? या प्रश्‍नावर बोलताना लसीची सक्ती करु शकत नाही. प्रत्येकाने लसीचे महत्व लक्षात घेऊन ती स्वयंपूर्णपणे घ्यावी. असे डॉ. बांदेकर म्हणाले.

Related Stories

No stories found.