डिचोलीत कोरोनाचा एक बळी

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

डिचोली तालुक्यात शुक्रवारी आणखी एक कोरोनाचा बळी गेला. उपचारार्थ बांबोळी येथील गोमेकॉत दाखल केलेल्या ७९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू आल्याची माहिती आरोग्य खात्याच्या बुलेटिनवरून मिळाली 
आहे.

डिचोली : डिचोली तालुक्यात शुक्रवारी आणखी एक कोरोनाचा बळी गेला. उपचारार्थ बांबोळी येथील गोमेकॉत दाखल केलेल्या ७९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू आल्याची माहिती आरोग्य खात्याच्या बुलेटिनवरून मिळाली 
आहे.

शुक्रवारी डिचोली तालुक्यात तेरा कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत, तर सलग सातव्या दिवशी डिचोलीतील कोविड सुविधा केंद्रात एकही रुग्ण नसल्याची माहिती मिळाली आहे. आज डिचोली विभागात ५, मये विभागात ७ आणि  साखळी विभागात १ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे. शुक्रवारी डिचोली विभागात ४८, मये विभागात ३५ आणि साखळी विभागात ५६ मिळून तालुक्यात एकूण १३९ सक्रिय रुग्ण आहेत. 

संबंधित बातम्या