CM Pramod Sawant: ‘हा’ सत्कार माझ्यासाठी परमभाग्याचा!

डॉ. प्रमोद सावंत: बेती येथे मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह खासदार तानावडे यांचाही ‘शांतादुर्गा’तर्फे सन्मान
CM pramod sawant
CM pramod sawantDainik Gomantak

श्री शांतादुर्गा पिळर्णकरीण संस्थानातर्फे माझा सन्मान होणे, ही माझ्यासाठी परमभाग्याची गोष्ट आहे, कारण विधानसभा व मंत्रालय क्षेत्र ज्या परिसरात आहे, त्या भागाची ती ग्रामदेवता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बेती येथील देवस्थानच्या सभागृहात झालेल्या आपल्या सत्काराला उत्तर देताना केले. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला.

CM pramod sawant
कविता नक्षत्रासारखी असते; तिच्या स्पर्शाने आयुष्य उजळते

देवस्थानचे अध्यक्ष शीतल चोडणकर यांच्या पुढाकाराने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचाही त्यांनी खासदारकीची पंचवीस वर्षे पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह व आकर्षक अशी तलवार प्रदान करून करण्यात आला. श्रीपाद नाईक यांनी सत्काराला उत्तर देताना शीतल चोडणकर यांच्या पुढाकाराने झालेल्या या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

खासदार सदानंद शेट तानावडे, डॉ. रवींद्र चोडणकर, जेजुरी खंडेराय देवस्थानचे विश्वस्त व अभिनेते डॉ. राजेंद्र खेडेकर, अॅड. सरेश लोटलीकर, ज्योतिषी चिंतामणी केळकर, मुरलीमोहन शेट्टी, आमदार केदार नाईक, दीप राजेंद्र सावंत, चैतन्य कुलकर्णी, संज्योती जगदाळे या सर्वांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

CM pramod sawant
G20 New Delhi Summit: युद्धामुळे जगात विश्वासाचा अभाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी

सत्मानमूर्तीतर्फे डॉ. राजेंद्र खेडेकर, डॉ. रवींद्र चोडणकर, अॅड. सरेश लोटलीकर आणि मुरलीमोहन शेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी दीप राजेंद्र सावंत याला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले.

सूत्रसंचालन संगम भोसले यांनी केले. प्रास्ताविक व मान्यवरांचे शाब्दिक स्वागत शीतल चोडणकर यांनी केले. तनिष्का शीतल चोडणकर यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले.

चोडणकरांची निस्वार्थी सेवा!

खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले, शीतल चोडणकर नेहमी समाजासाठी विविध उपक्रम राबवत असतात त्याचाच एक भाग म्हणजे हा सन्मान व सत्कार सोहळा. समाजिक उपक्रम राबविण्याची धडपड करणाऱ्या चोडणकरचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. त्यांची सेवा ही निस्वार्थी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com