South Goa: अस्वच्छतेवरुन 'ही' नदी सदैव प्रसिद्धीच्या झोतात

मडगाव व परिसरातील इमारतींमधील घाणेरडे, प्रदूषित पाणी या नाल्यांमध्ये सोडण्यावर निर्बंध घालण्यात येणार आहेत.
Sal River
Sal River Dainik Gomantak

Sal River: साळ नदी ही दक्षिण गोव्यातील लोकांची जीवनदायिनी मानली जाते. अस्वच्छतेवरुन ही नदी सदैव प्रसिद्धीच्या झोतात का? हे प्रश्न दुसरा तिसरा कोणी नाही तर खुद्द जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर स्वत: विचारत आहेत. सध्‍या या नदीची जी दयनीय स्थिती झालेली आहे, त्यास नागरिकच जबाबदार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

नागरिक हा जागरुक व संवेदनशील असला पाहिजे. साळ नदीच्या बाबतीत मडगाव व परिसरातील नागरिक संवेदनशील नाहीत, अशी खंतही त्‍यांनी व्‍यक्त केली. मडगावात एका कार्यक्रमाला आले असता साळ नदीबाबत शिरोडकर म्हणाले, नदी स्वच्छतेसाठी जलस्त्रोत खाते उपाययोजना तयार करीत असून पुढील आठ दिवसांत आपण त्यावर प्रकाश पाडू शकू, असे मंत्र्यांनी सांगितले.

साळ नदी अस्वच्छ व प्रदूषित होण्यामागे मडगाव व परिसरातील नाल्यांतील व मलनि:स्‍सारण पाईपलाईनमधील घाण नदीत सोडली जाते. या प्रकरणी सरकारनेही पावले उचलली असून प्रशासनाने त्यावर बारीक लक्ष ठेवले आहे. मडगाव व परिसरातील इमारतींमधील घाणेरडे, प्रदूषित पाणी या नाल्यांमध्ये सोडण्यावर निर्बंध घालण्यात येणार आहेत. शिवाय मलनि:स्‍सारण पाईपलाईनचे जाळे सर्वत्र पसरले जाणार आहे. नागरिकांनाही ही जोडणी सक्तीची जाईल.

नदी प्रदूषित करणारे प्रमुख स्रोत सापडले

साळ नदीत प्रदूषित पाणी कोठून सोडले जाते हे शोधून काढण्‍यात आले आहे. त्‍यात अंबाजी-फातोर्डा, जिल्हा इस्पितळानजीकचा पाण्याचा पाट, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी इमारतीनजीकचा नाला, कोलवा जंक्शनकडील ओहोळ, कोंब भागातील मलनि:स्‍सारण पाईपलाईन, खारेबांद परिसर, सायपे तळी, नावेली येथील कुडचडकर इस्पितळाकडील ओहोळ याचा त्‍यात प्रामुख्‍याने समावेश आहे.

Sal River
Goa Agriculture: बेकायदेशीर रोपवाटिकांवर कारवाई करा- परब

जिल्हाधिकाऱ्यांनी उचलली कडक पावले : दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी (आयएएस) यानी या प्रकरणी गांभीर्याने पावले उचलली आहेत. त्यांनी स्वत: सिवरेज साधनसुविधा विकास, मडगाव नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम खाते, एसजीपीडीए, जलस्त्रोत खात्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत साळ नदीबरोबरच या नदीला जोडणाऱ्या नाल्यांचीही पाहणी केली आहे. तसेच याकडे नियमितपणे लक्ष ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. यासंबंधी एक अहवाल तयार करुन सादर करण्याचा आदेश त्‍यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com