'गोव्यातील भाजप सरकार 'पॉर्न' ला गांभीर्याने घेत नाही का?'

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षततेखालील गोव्यातील सर्व चित्रीकरणांसाठी परवानगी देणाऱ्या गोवा मनोरंजन संस्थेने या अश्लील चित्रिकरणासाठी कशी परवानगी दिली असा प्रश्न गिरीश चोडणकर यांनी विचारून, मर्डर माफिया, ड्रग्स माफिया, भिकारी माफियांनंतर आता भाजप सरकार पॉर्न माफियाला प्रोत्साहन देत असल्याचे उघड झाले आहे, असा दावा गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

मडगाव : काणकोण येथील धरणावर चित्रिकरण केलेल्या एका मॉडेलचा अश्लील व्हिडिओ आज विविध समाजमाध्यमांवर फिरत असून या प्रकरणाने गोमंतकीयांना परत एकदा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने लाजेने मान खाली घालायला लावली आहे. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब याची दखल घेऊन कारवाई न केल्यास महिलांच्या सन्मानासाठी कॉंग्रेस पक्षाला परत एकदा रस्त्यावर यावे लागेल, असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षततेखालील गोव्यातील सर्व चित्रीकरणांसाठी परवानगी देणाऱ्या गोवा मनोरंजन संस्थेने या अश्लील चित्रिकरणासाठी कशी परवानगी दिली असा प्रश्न गिरीश चोडणकर यांनी विचारून, मर्डर माफिया, ड्रग्स माफिया, भिकारी माफियांनंतर आता भाजप सरकार पॉर्न माफियाला प्रोत्साहन देत असल्याचे उघड झाले आहे, असा दावा गिरीश चोडणकर यांनी केला आहे. आज काणकोणात तेथील धरणावर चित्रिकरण केलेला एक अत्यंत अश्लील व्हिडिओ समाजमाध्यमांवर झळकला व आतापर्यंत तो संपूर्ण गोवाभर पोचला असेल.

 
गोव्याचे मुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांच्या मोबाईल फोनवरून एका व्हॉट्‍सॲप ग्रुपवर वितरीत झालेल्या अश्लील व्हिडिओची चौकशी करणे व त्याला कोण जबाबदार होते हे शोधून काढणे सरकारला अजून जमले नाही, तोवर आता हा व्हिडिओ पुढे आला आहे. भाजप सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, अशी टीका गिरीश चोडणकर यांनी केली आहे. 
काणकोणच्या नागरिकांकडून आज मला अनेक फोन आले. काणकोणच्या धरणावर दिवसा उजेडात चित्रिकरण केलेल्या या व्हिडिओने काणकोणकरांना लाजेने मान खाली घालावी लागली आहे, असे चोडणकर यांनी म्हटले आहे. 
सरकारने ताबडतोब या एकंदर प्रकाराची चौकशी करून या अत्यंत अश्लील प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या