कोरोनासंबंधी अफवा पसरवणारांवर कठोर कारवाई : मामलेदार सतीश प्रभू

dainik gomantak
शनिवार, 23 मे 2020

हॉटेलच्या इमारतीत असलेल्या एका बॅंकेचे कामकाज दोन दिवस बंद ठेवण्यात आल्याचे या मेसेज मध्ये नमूद करण्यात आले होते.

मुरगाव, 

वास्को येथील हॉटेलमध्ये कोणीच कोरोनाग्रस्त रुग्ण सापडलेले नाहीत, नाहक अशा अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करू नये, असे प्रतिपादन मुरगावचे मामलेदार सतीश प्रभू यांनी केले. अशा अफवा पसरविणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा श्री. प्रभू यांनी दिला.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या नियमांमुळे हॉटेल व्यवहार बंद करण्यात आले आहे. वास्कोतील एक हॉटेल पूर्णपणे बंद आहे. तथापि मागील पंधरवड्यात या हॉटेलमध्ये एका कंपनीचे ग्राहक सर्व प्रकारची आरोग्य तपासणी करून वास्तव्यास आले होते. या तपासणीत सर्व ग्राहक निगेटिव्ह मिळाले. हॉटेलचे कर्मचारीही निगेटिव्ह असताना काल अचानकपणे समाज माध्यमामधून त्या हॉटेलात दोन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याचा संदेश व्हायरल झाला होता. यामुळे या हॉटेलच्या इमारतीत असलेल्या एका बॅंकेचे कामकाज दोन दिवस बंद ठेवण्यात आल्याचे या मेसेज मध्ये नमूद करण्यात आले होते.
समाज माध्यमावरून व्हायरल झालेल्या मेसेजमुळे त्या हॉटेलची बदनामी झाली. याची दखल घेत हॉटेलमालक अमिथ कुलकर्णी यांनी मुरगाव मामलेदार सतीश प्रभू यांच्याकडे कैफियत मांडली. हॉटेलमध्ये कोणालाच कोरोनाची लागण झालेली नसताना, नाहक बदनामी केल्याची दखल मामलेदार श्री.प्रभू यांनी घेऊन अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या