हिंदू संस्कृतीत पूर्वजन्म, पुनर्जन्माचा विचार

प्रतिनिधी
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

ब्रह्मेशानंदाचार्य : तपोभूमीवर दीप पूजनाने सर्वपित्री अमावस्या उत्सव

खांडोळा: हिंदू धर्मामध्ये हजारो वर्षांपासून अनेक विचार, संस्कार, संस्कृती ऋषिमुनींनी आपल्या प्रदान केले आहेत. ज्यामध्ये सर्वांचा अंतर्भाव आहे. तसे पाहता हिंदू श्रद्धाळू, बुद्धिवान असून सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये, असे गुण आहेत. सर्वपित्री अमावस्या भाद्रपद मासातील या तिथींना सर्वजण आपल्या पितरांना तृप्त करीत असतात. समाजाला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, अशा सर्वांचा विचार हिंदू धर्मात करण्यात आला आहे. मनुष्य बुद्धिवान, बलवान, कीर्तिवान व्हावा यासाठी मनुष्याच्या प्रत्येक क्षेत्रांचा विचार हिंदू जीवन प्रणालीत केलेला आहे. द्विपद, चतुष्पद अशा सर्वांचा विचार आपल्या संस्कृतीने केला आहे. सर्वपित्री अमावस्येत आपल्या पितरांचा विचार केला आहे, असे हे श्रेष्ठ दैवी विचार आहेत, असे संबोधन श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर धर्मभूषण ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी केले.

सर्वपित्री अमावस्या प्रीत्यर्थ संपन्न झालेल्या दीप पूजन तथा विष्णु सहस्रनाम पठण कार्यक्रमात पूज्य स्वामीजी संबोधित करीत होते.

आपला हिंदू धर्म तेजस्वी मानलेला आहे. पूर्वजन्म व पुनर्जन्माचा विचार हिंदू संस्कृतीत आहे. मनुष्य जन्माची इतिकर्तव्यता अर्थातच परिपूर्णता काय आहे, असे सर्वश्रेष्ठ ज्ञान हिंदू धर्मामध्ये आहे. आपल्या ऋषिमुनींनी तपःश्चर्या, त्याग असे शिक्षण दिले आहे. ज्या मनुष्याला आपल्या पितरांची मृततिथी माहित नाही, अशा सर्वांना पितृपक्षात कधीही श्राद्ध-तर्पण केले, तर सर्व तिथींना त्याने श्राद्ध केल्याचे फळ प्राप्त होते. त्यामुळे सर्व पितरांचे श्राद्ध करण्यासाठी ही तिथी महापुण्यदायक मानली गेली. जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय, असेही पूज्य स्वामीजींनी संबोधित केली.

सर्वपित्री अमावस्या निमित्ताने समस्त हिंदू धर्मियांद्वारे स्वकुळातील पितर तृप्तीसाठी घरोघरी विष्णु सहस्रनाम पाठ, दानधर्म, शास्त्रचर्चा एवं शिष्यांद्वारे गुरुमंत्र जपानुष्ठान संपन्न झाली. तसेच दुपारी १२:३० वाजता राष्ट्रसंत ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी समाधी महापूजा तथा आरती तसेच पंचपक्वान्न देवता भोजन, संध्याकाळच्या सत्रात सर्वपित्री अमावस्या विशेष दत्तगुरुवार भक्ती उत्सव प्रीत्यर्थ धर्मभूषण ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे दिव्य आशीर्वचन झाले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. goa

संबंधित बातम्या