Baina Murder Case: बायणा येथील हत्येप्रकरणी फरार तीन आरोपी जेरबंद

मुरगाव पोलिसांच्या पथकाने केले जेरबंद
Baina murder case
Baina murder caseDainik Gomantak

वास्को: काटे बायणा येथील उमेश हरिजन (33) याच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या आणखी तीन आरोपींना मुरगाव पोलिसांनी कर्नाटकात बागलकोट येथे अटक करण्यात आले आहे. आरोपींना रविवारी मुरगाव पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. जुम्मन शेख (28) परशुराम दोड्डामणी (25) आणि दुर्गाप्पा मदार (28) अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.

(Three accused Absconding in Baina murder case arrested)

Baina murder case
Goa: पर्यटकांना हूल्लडबाजी भोवली; कार रुतली बिचवर

काटे - बायाण - वास्को येथे 5 सप्टेंबर रोजी झालेल्या 33 वर्षीय उमेश हरीजन याच्या खून प्रकरणी पसार असलेल्या मृत उमेश हरीजन तीन संशयितांना रविवारी संध्याकाळी मुरगाव पोलिसांनी गोव्याबाहेरून गजाआड केले. उमेश हरीजन याचा पाच हत्यारांनी सपासप वार करून खून केला होता.

Baina murder case
डिचोली-साखळी रस्त्यावर मोकाट जनावरांमुळे अपघात वाढले

या घटनेनंतर पसार झालेल्यांपैकी अमीर हुसैन व दीपक सहानी या दोन संशयितांना फोंडा पोलिसांनी पाठलाग करून बाणस्तारी मार्गावरून गजाआड केले होते. तर जुम्मन, परशुराम ऊर्फ परश्या दोहुमणी आणि दुर्गाप्पा हे तिघे पसार झाले होते. त्यांना मुरगाव पोलिसांनी राज्याबाहेरून गजाआड केले. गेल्या सात दिवसांपासून मूरगाव पोलिस त्यांचा मागावर होते.

संशयित राज्याबाहेर कर्नाटकात बागलकोट एका ठिकाणी असल्याचे कळताच रविवारी पहाटे पथकाने तेथे जावून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी तिघेही आरोपी बेळगावला जायच्या तयारीत होते अशी माहिती पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com