वास्कोतील फ्लॅटमध्ये चोरी केल्याप्रकरणी तिघा चोरट्यांना अटक

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

कपाटात ठेवलेले रोख ४० हजार रुपये आणि एक लाख पन्नास हजार रुपये किंमतीचे दागिने मिळून एकूण एक लाख नव्वद हजार रुपयांचा ऐवज लुटला.​

मुरगाव- वास्को येथील खलप मेंशन इमारतीतील एका वकिलाच्या फ्लॅटमध्ये घूसून रोख रक्कम आणि सुवर्णालंकार मिळून एक लाख नव्वद हजार रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या तिघा अट्टल चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा सर्व माल जप्त केला.
  
 वास्को येथील वकील उल्हास शिरोडकर हे खलप मेंशन इमारतीत वास्तव्यास आहेत.फ्लॅटमध्ये कोणीच नसल्याची संधी साधून शंकर अलूर(हुबळी),राजू(पप्पू)गोलार(खारेवाडा), सतिश नारायण रेड्डी (वास्को) यांनी फ्लॅटचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले रोख ४० हजार रुपये आणि एक लाख पन्नास हजार रुपये किंमतीचे दागिने मिळून एकूण एक लाख नव्वद हजार रुपयांचा ऐवज लुटला.

याप्रकरणी वास्को पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिस निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रज्योती देसाई,हेड कॉन्स्टेबल संतोष भाटकर, पोलिस शिपाई सचिन बांदेकर,गौरीश सातार्डेकर, देविदास पालेकर यांनी तपास करुन वरील तीघा चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा सर्व ऐवज जप्त केला.

संबंधित बातम्या