राज्यात आयपीएल सामन्यांदरम्यान सट्टा लावणाऱ्या आणखी तिघांना अटक

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

अटकेतील तिघेही हैदराबाद येथील असून संदीप पटेल, कृष्णकांत व भोजा भोपाल यादव अशी तीनही आरोपींची नावे आहेत. मोरजी येथील हॉटेल 'अदारा प्राईम' येथे छापा टाकूऩ पोलिसांनी ही कारवाई केली.

पणजी- गोव्यात आयपीएल सामन्यांदरम्यान सट्टा लावल्याप्रकरणी मोरजी येथे आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लॅपटॉप, एलईडी स्क्रीन, मोबाईल फोन व रोख रक्कम रूपये १९,२०० हस्तगत करण्यात आले आहेत.

अटकेतील तिघेही हैदराबाद येथील असून संदीप पटेल, कृष्णकांत व भोजा भोपाल यादव अशी तीनही आरोपींची नावे आहेत. मोरजी येथील हॉटेल 'अदारा प्राईम' येथे छापा टाकूऩ पोलिसांनी ही कारवाई केली.

 गोव्यात बुकींनी आयपीएल सामन्यांदरम्यान आपला बस्तान बसवले असून बुधवारी कांदोळी येथील एका ठिकाणी  छापा मारून एका  रॅकेटचा कळंगूट पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या प्रकरणी राजस्थान तसेच भोपाळमधील मिळून पाच जणांना अटक झाली होती. त्या पाठोपाठ गुन्हे शाखेने मोरजी येथे ही कारवाई केली आहे.

आयपीएल क्रिकेट सामने सुरू होतात तेव्हा गोव्यात मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. त्यामुळे आणखीही काही बुकीज  गोव्यात असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या संदर्भात पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.  

मोरजीत सापडलेले तिघेही सट्टेबाज एका सराईत टोळीमधील असून गेली काही वर्षे ते हा धंदा करत असल्याची माहिती समोर आली आहे. आयपीयलचा मोसम सुरू झाला की  अशा प्रकारची बेटींग सुरू करतात.  

संबंधित बातम्या