मडगावात 13 किलो गांजासह तिघांना अटक; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

 गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गांजा या अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे पोलिसांनी नोंद केलेल्या गुन्ह्यांवरून आढळून येत आहे. 

मडगाव- अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने काल मध्यरात्री मडगावात तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तिघांना अटक केली. अटक करण्यात आलेले तिघेही अट्टल ड्रग्ज दलाल आहेत. या कारवाईत सुमारे १३.५० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत सुमारे १३.५० लाख रुपये आहे. 

खारेबांध-मडगाव येथील मुहाफिज ईस्माईल पठाण याच्याकडून १.३३ किलो गांजा, माजोर्डा-सालसेत येथील मिलेन कुमार पिल्ले याच्याकडून १0.३१० किलो तर कोंबा-मडगाव येथील विनायक दिगंबर जुवारकर याच्याकडून २ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. तीन वेगवेगळे गुन्ह्यांची नोंद करून पोलीस पुढील तपास करत आहेत.

  गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गांजा या अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे पोलिसांनी नोंद केलेल्या गुन्ह्यांवरून आढळून येत आहे. पुढेही काही गुन्हे समोर येण्याची शक्यता आहे. 

संबंधित बातम्या