तीन दिवस गोव्यात पाऊस; मात्र, पारा वाढणार!

वातावरण असेल ढगाळ आणि कोरडे
 तीन दिवस गोव्यात पाऊस; मात्र, पारा वाढणार!
Goa Weather UpdateDainik Gomantak

पणजी: हिंदी महासागरात अंदमान निकोबार बेटांजवळ आणि केरळजवळच्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील तीन दिवस म्हणजे 15, 16आणि 17 मे रोजी राज्यात तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे. मात्र, दिवसभर वातावरण काहीसे ढगाळ आणि कोरडे राहील. असे असले, तरी तापमानात किंचित बदल होऊन पारा एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

Goa Weather Update
‘मडगाव अर्बन’च्‍या ठेवीदारांना दिलासा

मॉन्सून चार दिवस आधीच

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असला तरी राज्यातील वातावरण ढगाळ राहणार आहे. रविवारपासून पुढील तीन दिवस राज्यात पावसाच्या हलक्या सरी पडतील. सध्या अंदमान निकोबार बेटाजवळ मॉन्सून सक्रिय होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा मॉन्सून नेहमीपेक्षा चार दिवस अगोदरच केरळमध्ये पोचण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Goa Weather Update
‘अमर लता’ मैफलीला कुडचडेत ‘चार चांद’

साखळीत सर्वाधिक मॉन्सूनपूर्व पाऊस

(गेल्या 24 तासांत राज्यात मॉन्सूनपूर्व सरी पडल्या नाहीत.)

राज्यातील मॉन्सूनपूर्व पाऊस: पाऊस मिलीमीटरमध्ये

साखळी- 110.9

म्हापसा- 75.9

मडगाव- 70.2

सांगे- 69.2

पणजी- 61.1

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.