कोविडमुळे चोवीस तासांत तिघांचा मृत्यू

दैनिक गोमंतक
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

राज्यात आज आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू झाले. ज्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ६७० वर येऊन पोचली आहे.

पणजी : राज्यात आज आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू झाले. ज्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ६७० वर येऊन पोचली आहे. आज १६२ लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली तर १७८ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे राज्यात १३६४ इतके कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. राज्याच्या रिकव्हरी रेटमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९५.६१ टक्के इतका आहे. 

आज ज्या तीन रुग्णांचे मृत्यू झाले त्यांच्यामध्ये फातोर्डा येथील ६८ वर्षीय पुरुष, म्हार्दोळ येथील ६७ वर्षीय महिला आणि आल्डोना येथील ७२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. हे तिन्ही मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहेत. 
आज दिवसभरात १७१६ इतक्या कोरोना पडताळणी चाचण्या करण्यात आल्या. आज १७२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला तर ३६ रुग्णांना इस्पितळात भरती करण्यात आले. राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अजून खाट शिल्लक आहेत. उत्तर गोव्यात २१० खाट तर दक्षिण गोव्यात २१२ खाट शिल्लक आहेत.

डिचोली आरोग्य केंद्रात ३६ रुग्ण, साखळी आरोग्य केंद्रात ३८ रुग्ण, पणजी आरोग्य केंद्रात ९३ रुग्ण, कांदोळी आरोग्य केंद्रात ७० रुग्ण, चिंबल आरोग्य केंद्रात ६६ रुग्ण, मडगाव आरोग्य केंद्रात १०३ रुग्ण, वास्को आरोग्य केंद्रात ८६ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्रात १०७ रुग्ण आणि नावेली आरोग्य केंद्रात ३६ रुग्ण कोरोनाच्या उपचारासाठी भरती आहेत.

गोव्यात उत्तम सुविधा
दिल्लीच्या तुलनेत गोव्यातील आरोग्यसुविधा उत्तम दर्जाच्या आहेत. दिल्लीच्या आमदाराने येथे येऊन लोकांची दिशाभूल करू नये. दिल्लीत कोविड रुग्ण का वाढत आहेत, याचे आपचे आमदार उत्तर राघव चढ्ढा यांनी द्यावे, नंतरच गोव्याच्या आरोग्य सेवेबाबत बोलावे. येत्या काही दिवसात राज्यातील  हॉटेलमध्ये आइसोलेशन खोल्या असाव्यात यासाठी आम्ही मार्गदर्शक तत्व जारी करणार अअसल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.

आणखी वाचा:

 

संबंधित बातम्या