Chorla Ghat Accident: चोर्ला घाट महामार्गावर कार दरीत कोसळली

तिघे गंभीर जखमी : ‘गोमेकॉ’त उपचार सुरू, गाडीचे मोठे नुकसान
Chorla Ghat Accident
Chorla Ghat Accident Gomantak Digital Team

Chorla Ghat Accident: चोर्ला घाटात रविवारी रात्री उशीरा झालेल्या अपघातात कार थेट दरीत कोसळली. गाडीचे मोठे नुकसान झाले. या कारमध्ये तिघेजण अडकून पडले होते.

अपघाताची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन केंद्रातील जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्री बचाव मोहिम राबवत अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून या तिघांचाही जीव वाचला आहे. गंभीर जखमी गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

अंजुना धरण परिसरात ही घटना घडली. ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. रात्री १२ वाजून २० मिनिटांनी अग्निशमन दलाला या अपघाताची माहिती मिळाली.

त्यानंतर वाळपई अग्निशमन दलातील एस. के. गावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान बाबुराव गावस, सुधाकर गावकर, सोमनाथ गावकर, उमेश गावकर, फाती कलमिसकार यांचा या पथकात समावेश होता.

Chorla Ghat Accident
Salman Khan's New Song : सलमानच्या नव्या गाण्याचा टिजर रिलीज...यादिवशी गाणं पाहता येणार

स्पॉटलाईट व दोरखंडाचा वापर

स्पॉटलाईट आणि दोरखंडाचा वापर करत अग्निशमन दलाच्या जवानांनी कारमध्ये अडकलेल्या तिघांनाही वाचवले. त्यांना सुखरूप बाहेर काढले.

कारमधील तिघेही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. यावेळी वाळपई पोलिस पुढील तपास करत आहे.

Chorla Ghat Accident
Hindenburg: हिंडेनबर्गचा डाव फसला, अदानी सारखा Block Inc विरोधातील अहवाल नाही ठरला फायदेशीर

अरूंद रस्ता आणि वळणे

गोवा- बेळगावसाठी चोर्ला घाट महामार्ग हा अगदी जवळचा रस्ता आहे. त्यामुळे अनेकजण चोर्लाघाटमार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची संख्या खूपच वाढली आहे.

अरूंद रस्ता व धोकादायक वळणामुळे वाहनांवरी नियंत्रण जात असून या मार्गावर कायम अपघात होत आहे, असे वाहन चालकांचे मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com