Goa: गॅस सिलिंडरच्या स्फोटात केपेत तीन जण जखमी

Gas Cylinder Explosions: जखमींना हॉस्पिसियो इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Gas Cylinder Explosions
Gas Cylinder ExplosionsDainik Gomantak

मडगाव: स्वयंपाक गॅसची दुरुस्ती करताना गॅस गळती झाल्याने झालेल्या स्फोटात केपे येथे तीन जण जखमी झाले. जखमींना हॉस्पिसियो इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, जखमींची नावे वेलनसिया फेर्नांडिस (32), ट्रीझा मिरांडा (40) व गॅस मॅकेनिक शेख अब्दूल रेहमान अशी असून हे सर्व 20 ते 30 टक्के भाजले आहेत. (Quepem Latest News)

Gas Cylinder Explosions
Goa News : खाद्यतेलाच्या भेसळीवर पाळत

मिळालेल्या माहितीनुसार सोनारभाट केपे येथे एका घरात गॅसची दुरुस्ती चालू असताना ही गळती सुरू झाली. त्याचवेळी बाहेर एक चूल पेटत होती. या गॅसची या आगीशी संपर्क आल्याने ही आग भडकली. या दुर्घटनेत भाजलेल्या रुग्णांना 108 रुग्णवाहिकेतून इस्पितळात (Hospital) हलविण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com