झुआरीनगर येथील कारखान्यात स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू

कंत्राटी कामगार म्हणून करत होते काम
Blast at factory in Juwarinagar
Blast at factory in JuwarinagarDainik Gomantak

वास्को: झुआरीनगर येथील कारखान्यात आज मंगळवारी झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला. इंद्रजीत घोष, मृत्युंजय आणि जय किसान सिंग अशी मृत व्यक्तींची नावे असून हे कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते. कंपनीच्या युरिया प्लांटमध्ये कंडेनशन टँकमध्ये काम करताना मंगळवारी दुपारी 2.45 वाजता झालेल्या स्फोटात सदर तीनही कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला. (Three killed in blast at factory in Zuarinagar)

Blast at factory in Juwarinagar
सिंगापूर सफारीची तिकिटे देताना हलगर्जीपणा केल्याने एअर इंडियाला दणका

मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या 30 तारखेला या कंपनी मधील युरिया प्लांटचे शटडाऊनचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार त्यांचे काम चालू होते. या कामात कंट्राटदाराचे कर्मचारी सहा मीटर उंचीवर असलेल्या टाकीचा नट बोल्ट काढत होते. त्यासाठी कोल्ड वकॆ वापरण्याची शिफारस केली होती.

मात्र त्यांनी गॅस कटिंग तंत्रज्ञान वापरले ज्यामुळे टँकमध्ये स्फोट झाला व काम करत असलेल्या कामगारांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळाली. इंद्रजीत घोष, मृत्युंजय आणि जयकिसन सिंग हे कंपनीचे कामगार नसून कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटदारांचे कामगार होते. कंडेन्शन टँक मध्ये वायू गॅस जाताना सदर स्पोट घडला व सहा मीटर उंचीवर असलेल्या टाकीवर काम करणारे सदर कंत्राटी कामगार या स्फोटात ठार झाले.

Blast at factory in Juwarinagar
नागोवा मैदानावर बंगळूर एफसीचे विजयी पंचक

सदर घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर तिन्ही कामगारांना कंपनीच्या रुग्णवाहिकेतून चिखली येथील साळगावकर इस्पितळात नेण्यात आले. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच वेरना पोलीस व अग्निशामक दल यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मूरगावचे उपजिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com