गोव्यातील तीन तळ्यांना मिळणार आंतरराष्ट्रीय पाणवठ्याचा दर्जा

पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या मये तळ्यासह इतर तळ्यांचाही समावेश करण्यात येणार
Three lakes in Goa will get international water status
Three lakes in Goa will get international water status Dainik Gomantak

मडगाव: सांताक्रूझ(St. Cruz) येथील बोंडवेल तळ्यासह एकूण तीन पाणवठ्यांना (Water supply) आंतरराष्ट्रीय महत्वाचे पाणवठे हा दर्जा (International standards) मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या रामसार करारानुसार हा दर्जा दिला जाणार आहे.

गोवा राज्य पाणवठा प्राधिकरणाच्या (Goa State Water Authority) माहितीनुसार जैवविविधतेच्या संपन्नतेचे प्रमाण पाहून हा दर्जा दिला जात असून बोंडवेल तळे यात चपखल बसत असून त्यामुळे हा दर्जा देण्यात आला आहे. इतर पाणथळ जागांचे सध्या सर्वेक्षण चालू आहे. हा दर्जा प्राप्त झाल्यानंतर तेथील जैवविविधतेचे संवर्धन करण्यावर भर दिला जाणार आहे.

Three lakes in Goa will get international water status
Goa Tourist: गोव्याची दारे खुली न झाल्याने रशियन पर्यटक इजिप्तकडे वळण्याची भीती

गोव्यात बोंडवेल तळ्याला हा दर्जा यापूर्वीच दिला गेला असून प्रसिद्ध असलेले करमळीचे तळे, चिंबल येथील तळे, बेतीचे तळे, रिवण येथील दशी तळे, पिळर्ण तळे, सालझोरा तळे, चिंचोणे येथील दुर्गा तळे, कुडचडे येथील कोठंबी आणि नंदा तळे तसेच केपे येथील शेल्डे तळे यांचा विचार चालू आहे अशी माहिती संबंधित सूत्रांकडून मिळाली.

याच मालिकेत पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या मये तळ्यासह, आगशी येथील सुलाभाट तळे, तळावली तळे, शिरोडा येथील तरवळे आणि उदें तळे, कुडतरी तळे, मायणा येथील सोबे तळे, गिरदोली येथील कोमुनिदाद तळे, माकझान तळे, वेर्णाचे आंबूलोर तळे, बाणावलीचे कमळा तळे, ओर्ली तळे, सांखवाळ तळे व केपे येथील पाली तळ्याचाही समावेश करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

Three lakes in Goa will get international water status
Goa Election 2022: बाप्पाकडे विजयाचा आशीर्वाद घेऊन विरोधकांचा पाप-कर्माला आरंभ

सध्या सरकारने कुरका , मळेभाट, गवळी - मौळा आणि कामुर्ली (कुरका), बाणास्तरी तळे, पर्रा तळे, मायमोळे तळे, वेळ्ळीचे सापू तळे आणि बाणावली येथील बाणावली तळे, व्हडले तळे व धाकटे तळे यांची माहिती नोंदविण्यास सुरवात केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com