Leopard In Borim : बिबट्यासह तीन बछडे आढळल्याने घबराट; बोरी येथील प्रकार

वन्य प्राणी पुन्हा लोकवस्तीकडे; वन खात्याने लक्ष देण्याची गरज
Leopard with three curbs spotted Shirshirem, Borim Goa
Leopard with three curbs spotted Shirshirem, Borim GoaDainik Gomantak

पाण्याचे दुर्भीक्ष किंवा भक्ष्याच्या शोधात वन्य प्राणी पुन्हा लोकवस्तीकडे वळत आहेत. शुक्रवारी शिरशिरे-बोरी येथील लक्ष्मण जोशी यांच्या शेतातील गवतात एक बिबटा व तीन बछडे आढळून आले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याची माहिती मिळताच फोंडा वन खात्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, सायंकाळपर्यंत बिबटा आणि बछड्यांना पकडण्यात वन खात्याला यश आले नाही.

Leopard with three curbs spotted Shirshirem, Borim Goa
PWD Recruitment Scam : नोकऱ्यांसाठी पैसे मोजलेल्या उमेदवारांच्या निवडीसाठी प्रयत्न

शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास घराशेजारील शेतात लक्ष्मण जोशी हे आपल्या गुरांसाठी गवत काढण्यासाठी गेले होते. गवत कापताना त्यांना बिबट्याचा आवाज ऐकू आला. प्रसंगावधान राखून जोशी यांनी तेथून पळ काढला. यामुळे या भागात घबराट निर्माण झाली आहे.

यापूर्वीही आला होता बिबट्या

जोशी यांना बिबट्यासह तीन बछडे दृष्टीस पडले. त्यांना पाहताच एक बछडा गवतात पळून गेला. या प्रकारामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन वर्षांपूर्वी या भागातच बोरीचे माजी सरपंच चंद्रु गावडे यांच्या शेतात बिबट्याने हैदोस घातला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com