डिचोली तालुक्यात तीन नवे कोरोनाबाधित रुग्ण 

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

डिचोली तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कालपासून कमालीची घट झाली आहे. शनिवारी  तालुक्यात केवळ तीनच कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत, तर मागील आठवड्यापासून  डिचोलीतील कोविड सुविधा केंद्रात एकही रुग्ण नसल्याची माहिती मिळाली आहे.

डिचोली :  डिचोली तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कालपासून कमालीची घट झाली आहे. शनिवारी  तालुक्यात केवळ तीनच कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत, तर मागील आठवड्यापासून  डिचोलीतील कोविड सुविधा केंद्रात एकही रुग्ण नसल्याची माहिती मिळाली आहे. आज डिचोली विभागात १, मये विभागात २ नवीन  कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले  आहेत. साखळी विभागात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे.

संबंधित बातम्या