आणखी तीन बळी

Tejshri Kumbhar
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

सोमवारी आणखी तीन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. त्‍यामुळे कोरोना बळींची संख्‍या ५६ झाली आहे. मागील चोवीस तासांत २०८ पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर पडली. तर २८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात १८८४ एवढे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. अद्याप ९८३ जणांचे कोरोना पडताळणी अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती आरोग्‍य खात्‍याने दिली.

तेजश्री कुंभार

पणजी :

सोमवारी आणखी तीन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. त्‍यामुळे कोरोना बळींची संख्‍या ५६ झाली आहे. मागील चोवीस तासांत २०८ पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर पडली. तर २८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात १८८४ एवढे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. अद्याप ९८३ जणांचे कोरोना पडताळणी अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती आरोग्‍य खात्‍याने दिली.
सोमवारी मृत्यू झालेल्‍यांत मेरशी येथील ७२ वर्षीय पुरुष, सांगे येथील ७० वर्षीय महिला आणि वास्को येथील ६८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. बाकीचे रुग्ण कोविड इस्पितळात दगावले असून वास्को येथील महिलेचा मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथे झाल्याची माहिती मिळाली.

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजच्या दिवशी हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ५७ जणांना ठेवण्यात आले. १२९७ जणांच्‍या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर २२६५ जणांचे अहवाल हाती आहेत. रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले २१ रुग्ण आहेत. डिचोलीत १०, साखळीत ४६, पेडणेत २२, वाळपईत ४६, म्हापशात ६८, पणजीत ७९, बेतकी येथे १६, कांदोळीत ५१, कोलवाळ येथे ३३, खोर्लीत २८, चिंबल येथे १०४, पर्वरीत ४२, कुडचडेत २३, काणकोणात ८, मडगावात १२०, वास्कोत ३९०, लोटलीत ३२, मेरशीत २४, केपेत २१, शिरोडा येथे २९, धारबांदोडा येथे ३०, फोंड्यात १०२ आणि नावेलीत ३२ रुग्‍ण आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

अधिकाऱ्यालाही कोरोना
कोरोना योद्धे म्‍हणून जबाबदारीने सेवा बजाविणारे मुरगाव मामलेदार कार्यालयातील अधिकाऱ्यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्‍यामुळे त्‍यांना होम क्वारंटाईन केले आहे. मुरगाव मामलेदार कार्यालयातील एकूण दहा कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्‍यापैकी काहीजणांना क्वारंटाईन, तर काहीजण कोविड केअर सेंटरमध्‍ये दाखल झाले आहेत. यापूर्वी आरोग्य खात्याचे कर्मचारी मांगोरहिल कंटेन्‍मेंट झोनमध्ये सेवा बजावित असताना कोरोनाबाधीत झाले होते. टपाल कार्यालयातील कर्मचारी तसेच पालिकेतील नगरसेवक आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्‍ह आढळले होते. ज्‍येष्‍ठ नगरसेवक पाश्कोल डिसोझा हे कोरोनाचे बळी ठरले होते.

 

संपादन : महेश तांडेल

संबंधित बातम्या