म्हापसा पालिकेच्या विरोधी गटातील तीन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश!

म्हापसा पालिकेच्या विरोधी गटातील तीन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश!
goa Bjp Corporators.jpg

भाजपविरोधी (BJP) गटातून निवडून आलेले म्हापसा (Mapusa) नगरपालिकेचे तीन नवनिर्वाचित नगरसेवक (Corporater) आज मंगळवारी  भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला आहे. प्रभाग सातचे नगरसेवक तारक आरोलकर, प्रभाग आठचे विकास आरोलकर व प्रभाग सोळाचे नगरसेवक विराज विनोद फडके अशी त्यांची नावे आहेत. (Three opposition corporators from Mapusa join BJP)


हे तिन्ही नगरसेवक माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांच्या नेतृत्वाखालील ‘म्हापशेकरांचो एकवट’ गटाच्या उमेदवारीवर निवडून आले होते. त्या गटातील अन्य एक नगरसेवक शुभांगी गुरुदास वायंगणकर यांनी या पूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. या नवीन राजकीय घडामोडींमुळे या वीस-सदस्यीय पालिका मंडळात आता भाजपपुरस्कृत ‘म्हापसा विकास आघाडी’ची सदस्यसंख्या नऊवरून तेरावर पोहोचली आहे, तर ‘म्हापशेकरांचो एकवट’ची सदस्यसंख्या नऊवरून पाचवर घसरली आहे. मतमोजणी झाली तेव्हा ‘म्हापसा विकास आघाडी’ला नऊ जागा, ‘म्हापशेकरांचो एकवट’ला नऊ जागा, तर दोन जागा अपक्षांना मिळाल्या होत्या.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, आमदार ग्लेन टिकलो, माजी नगरसेवक फ्रँकी कार्वाल्हो व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com