कोणाची मते फुटली, हे जगजाहीर : पाटकर

‘आप’ आणि ‘आरजी’कडे अंगुलीनिर्देश
Amit Patkar
Amit Patkar Dainik Gomantak

पणजी: उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार दिलायला लोबो यांना तीन विरोधी आमदारांनी मतदान केले नाही. यात ‘आप’चे दोन, तर ‘आरजी’च्या एका आमदाराचा समावेश होता. राष्ट्रपती निवडणुकीत कोणत्या तीन आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले होते, ते आता उघड झाले आहे. साहजिकच भाजपची ए आणि बी टीम गोमंतकीयांच्या समोर आली आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ट्विटद्वारे केला.

(Three opposition MLAs did not vote for Congress candidate Dilaila Lobo in the election for the post of Deputy Speaker)

Amit Patkar
उपसभापती जोशुआ डिसोझा यांचे सभागृहात अभिनंदन!

राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल काल आल्यानंतर गोव्यातील तीन विरोधी आमदारांनी राष्ट्रपतिपदी निवड झालेल्या द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याचे उघड झाले होते. त्यात काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेमुळे काँग्रेसवर संशय व्यक्त केला जात होता. परंतु, निवडणुकीपूर्वी आमदारांनी आपण पक्षाने समर्थन दिलेल्या गटाच्या उमेदवाराला मतदान केल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले होते. आज झालेल्या घडामोडीतून कोण भाजपसाठी काम करते, हे उघड झाले आहे. मी काल सांगितले होते की, काँग्रेसच्या आमदारांची मते फुटलेली नाहीत. तेव्हा कुणीही माझ्यावर विश्‍वास ठेवला नाही, असे पाटकर म्हणाले.

आरजी, कॉंग्रेसमध्ये कलगी तुरा

‘आरजी’वर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केल्याने तुमच्यात मानसिक आजाराची लक्षणे दिसून येतात, असा पलटवार आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी अमित पाटकर यांच्यावर ट्विटद्वारे केला आहे. तर परब यांना काँग्रेसचे प्रसार माध्यमप्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हाला मिरची तिखट लागली आहे, हे या प्रतिक्रियेवरून दिसते, असे म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com