ऑगस्ट महिन्यात डिचोली तालुक्‍यातील वेगवेगळ्या घटनांत एका बालकासह तिघांचा बुडून मृत्यू

प्रतिनिधी
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

‘कोरोना’चे संकट सुरूच, डिचोली तालुक्‍यात सहा जणांचे बळी

 डिचोली:  सणासुदींचा मागील ऑगस्ट महिना डिचोलीसाठी दुर्दैवी ठरला आहे. ऑगस्ट महिन्यात डिचोली तालुक्‍यातील वेगवेगळ्या घटनांत एका बालकासह तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, कोरोनाचे संकट सुरूच असून, ऑगस्ट महिन्यात एका नवविहितासह सहाजणांचे कोरोनाने बळी घेतले आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीलाच राजकीय क्षेत्राला मोठा धक्‍का बसला. मयेचे माजी आमदार तथा माजी सभापती अनंत शेट यांचे २ ऑगस्ट रोजी अल्प आजाराने निधन झाले. १७ ऑगस्ट रोजी लाटंबार्से-नानोडा परिसरात चिरेखाणीत बुडून बालकाचा दुर्दैवी अंत झाला.

आपल्या कुटुंबियांसमवेत नैसर्गिक पर्यटनासाठी आलेल्या कळंगूट येथील अरीफ पंचम्हालदार या दहा वर्षीय बालकाचा चिरेखाणीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर २७ रोजी हरवळे धबधब्यावर पावसाळी पर्यटनासाठी आपल्या मित्रांसमवेत आलेल्या जुने गोवे येथील भालचंद्र पाटील या युवकाचा बुडून मृत्यू झाला. तर चार दिवसांपूर्वी म्हणजेच २८ रोजी गावकरवाडा-मये येथे एका ५० वर्षीय महिलेचा विहिरीत पडून मृत्यू होण्याची घटना घडली आहे. 
 

संबंधित बातम्या