पिस्तुल विकणारे तिघेजण गजाआड

 Three people selling pistols go missing
Three people selling pistols go missing

पणजी :  मडगावातील गजबजलेल्या परिसरात भरदुपारी सराफी दुकानात प्रवेश करून मालक स्वप्नील वाळके याच्या खूनप्रकरणी क्राईम ब्रँचने आणखी तिघांना आज बिहार येथे अटक केली. त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या सहा झाली आहे. वाळके याच्यावर ज्या पिस्तुलने गोळी झाडण्यात आली होती ते बिहार येथून या तिघांनी ७० हजार रुपयांना संशयित मुस्तफा व एव्हेंडर याना विकले होते. पोलिस पथक या तिघांना घेऊन गोव्याला येण्यास निघाले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिली. 


बिहार येथे क्राईम ब्रँचने अटक केलेल्यांची नावे राहुल सितेस डॉम कुमार (१९ वर्षे), शानी सुनिल राम कुमार (३४ वर्षे) व कुंदन कुमार अशी आहेत. हे सर्वजण बेगुसराई (बिहार) येथील रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचचे पथक निरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांच्या नेतृत्वाखाली बिहारला गेले होते. संशयित मुस्तफा शेख व एव्हेंडर रॉड्रिग्ज या दोघानी चौकशीत पिस्तुल बिहार येथून आणल्याची माहिती उघड केली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी बेगुसराई (बिहार) पोलिसांची मदत गोवा पोलिसांनी घेतली. गेल्या काही दिवसांपासून हे पथक बेगुसराई या भागात ठाण मांडून होते. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयितांची माहिती जमा करत होते. या तिघाना ते राहत असलेल्या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. 


ही घटना घडल्यास ४० दिवस उलटून गेले आहेत. कोविड महामारीमुळे बिहारला जाण्यासाठी रेल्वे सेवा नसल्याने पोलिसांना दिल्लीमार्गे बिहारला जाण्यास वेळ लागला. संशयित मूळ गावी असल्याची खात्री बेगुसराई पोलिसांनी दिल्यानंतरच पूर्वतयारीनिशी गोव्यातून पथक बिहाराला रवाना झाले होते. या संशयितांना गोव्यात आणून त्यांची 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com