गोव्यात वाहने फोडणारी टोळी जेरबंद!

वास्‍कोत कारवाई : तिघांना अटक; चोरीचा माल केला हस्‍तगत
गोव्यात वाहने फोडणारी टोळी जेरबंद!
Three arrested in goa theft caseDainik Gomantak

पणजी: येथील मेरी इम्यॅक्युलेट चर्चजवळ पार्क करून ठेवलेल्या वाहनाची काच फोडून आतील साहित्‍य लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करताना पणजी पोलिसांनी वास्को येथून तिघांना शिताफीने अटक केली. श्रीशांत शेकू राठोड, सुनील हनमुंत माधव व सिकंदर ऊर्फ चिकू शेख अब्दुल बडेसाहब अशी संशयितांची नावे असून त्‍यांच्‍याकडून चोरलेल्या वस्तू, कपडे, रोख रक्कम तसेच पळून जाण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी जप्त करण्‍यात आली आहे.

(Three thieves arrested in Goa)

Three arrested in goa theft case
राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले?

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, श्रीशांत, सुनील व सिकंदर हे तिघेही संशयित मूळ कर्नाटकातील असून सध्या बायणा-वास्को येथे राहतात. त्यांची पार्श्‍वभूमी तपासण्यासाठी कर्नाटक पोलिसांशीही संपर्क साधण्‍यात आला आहे. डोंबिवली-मुंबई येथील रोहित भट हे आपल्या कुटुंबीयांसह गोवा फिरण्यासाठी आले होते. काल मंगळवारी 21 जून रोजी दुपारी त्‍यांनी आपली गाडी पणजी चर्च चौकात पार्क केली व ते चर्च पाहण्यासाठी गेले. पुन्हा आले असता त्‍यांना गाडीची काच फोडलेली दिसली. आतील साहित्‍यही गायब झाले होते. त्यामध्ये 15 हजार रुपयांचे हेडफोन्स, 10 हजार रुपयांची रोख रक्कम, पॉवर बँक, चार्चिंग केबल्स तसेच कपड्यांचा समावेश होता. या प्रकरणाची तक्रार पणजी पोलिसांत दाखल केल्यानंतर तपासाची यंत्रणा वेगाने सुरू झाली.

Three arrested in goa theft case
बलात्कार आणि खूनप्रकरणी तुरुंगात असणाऱ्या विकटसाठी ड्रग्सचा पुरवठा

दरम्‍यान, संशयित श्रीशांत, सुनील व सिकंदर या तिघांनाही उद्या गुरुवार दि. 23 रोजी पोलिस कोठडीसाठी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. या टोळीचा राज्यातील इतर गुन्ह्यांमध्ये हात आहे का, याचीही चौकशी सुरू आहे.

पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या नेतृत्वाखाली पणजी पोलिस पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास सुरू आहे.

‘सीसीटीव्‍ही’ने केली पोलखोल

ज्या पार्किंग क्षेत्रातून म्‍हणजे चर्च चौकातून गाडीतील सामान लंपास झाले होते, तेथे जवळपास असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पणजी पोलिसांनी माहिती मिळविण्‍याचा प्रयत्‍न केला. या माहितीच्या आधारे संशयितांनी चोरीसाठी गाडीचा वापर केला असल्याचे उघड होताच त्यावरील क्रमांक टिपला. साहजिकच पोलिसांना संशयितांपर्यंत पोचण्‍यास मदत झाली. गाडीच्या मालकाचा शोध घेतल्यावर संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्याकडून चोरलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com