‘यूजीएफ’च्या तीन नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

three UGF leaders from goa joins congress
three UGF leaders from goa joins congress

पणजी- युनायटेड गोअन्स फाऊंडेशनच्या (यूजीएफ) तिघा पदाधिकाऱ्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांचे स्वागत केले. काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी गोमंतकीय जनतेच्या हिताचे प्रश्‍न घेऊनच पूर्वीप्रमाणेच काम करत भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला जाणार आहे, असे मत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ. आशिष कामत यांनी व्यक्त केले. 

यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस, स्वाती केरकर व काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले डॉ. आशिष कामत, वेळ्ळीचे माजी सरपंच डॉम्निक नोरोन्हा, केपेचे चार्ल्स डिसिल्वा व चार्टर्ड अकाऊंटंट अनुप बोरकर हे उपस्थित होते. 

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, राहुल गांधी गोवा भेटीवर असताना युनायटेड गोअन्स फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली होती. तेव्हा त्यांना गांधी यांनी काँग्रेसमध्ये येण्यास सांगितले होते. युनायटेड गोअन्स फाऊंडेशने गोमंतकीयांच्या हिताचे प्रश्‍न हाती घेऊन ते धसास लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये जायका घोटाळा, सायबर एज योजना निविदा घोटाळा, गोवा साधनसुविधा विकास महामंडळ व गोवा औद्योगिक विकास महामंडळ घोटाळा व गृहनिर्माण घोटाळा यासारखे विषय हाती घेतले होते. 

डॉ. आशिश कामत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागे उत्तर देताना सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विचाराने प्रभावित झालो होतो तसेच त्यांचे विचार युनायटेड गोअन्स फाऊंडेशनने हाती घेतलेल्या प्रश्‍नांशी साम्य होते. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी व लोकांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला. जे विचार आहेत त्यात बदल नाही व तोच उद्देश पुढे घेऊन पक्षाच्या मदतीने जाणार आहोत. भाजप सरकार अर्थव्यवस्था व आरोग्याबाबत गंभीर नाही. गोवा व त्याचे अस्तित्व हे ध्येय घेऊनच काम केले जाणार असून कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

देशात व राज्यात भाजप सरकार राज्य करत आहे. या सरकारांनी लोकशाहीचा खून केला आहे. ग्रामस्थांचे असलेले अधिकार काढून घेण्यात आले आहेत. माहिती हक्क कायदा काँग्रेसने आणला मात्र त्यातील पारदर्शकता भाजपने नष्ट केली आहे. या कायद्यखाली माहिती सरकारी खात्याकडून जाणुनबुजून दिली जात नाही, असे डॉम्निक नोरोन्हा म्हणाले. 

केपेचे आमदार काँग्रेसमधून जिंकून आले व भाजपमध्ये प्रवेश केला. केपे तालुक्यातील ग्रामीण भागात काहीच विकास झालेला नाही. केपेत ओएनजीसीसाठी सुमारे साडेतीन लाख चौ. मी. लोकांची जमीन गेली आहे. मेळावली ग्रामस्थांना आयआयटी प्रकल्प नको आहे तर सरकारने ‘डेफेन्स एक्स्पो’साठी वापरलेली जमीन आहे तेथे तो हलविण्यात यावा. यापूर्वी आयआयटी प्रकल्पासाठी सरकारची जमीन आहे. बेतुल येथे नवे बंदर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र ग्रामस्थांना नको असल्यास तो प्रकल्प लादला देणार नाही असे स्पष्ट करून चार्ल्स डिसिल्वा म्हणाले की, पंचायत व ग्रामस्थांना अधिक सक्षम करण्याची गरज आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com