राज्यात चोवीस तासांत कोरोनाचे तीन बळी

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

राज्यात आज तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू झाले. आज दिवसभरात ११७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर ६४ जण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्यात चौदाशे सोळा सक्रिय रुग्ण असून राज्याचा रिकव्हरी रेट ९५.६३ टक्के इतका आहे.

पणजी : राज्यात आज तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू झाले. आज दिवसभरात ११७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर ६४ जण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्यात चौदाशे सोळा सक्रिय रुग्ण असून राज्याचा रिकव्हरी रेट ९५.६३ टक्के इतका आहे.

आज ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्यामध्ये केपे येथील ५८ वर्षीय महिला, वेर्णा येथील ८५ वर्षीय पुरुष, मडगाव येथील ३५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. यातील दोन व्यक्ती गोवा वैद्यकीय महाविद्यालयात, एक मृत्यू हॉस्पिसिओ रुग्णालयात झाला असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील कोविड इस्पितळांमध्ये उपचारासाठी पुरेशी जागा शिल्लक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यात खाटांची संख्या २७५ इतकी असून सध्या २२७  खाट वापरासाठी उपलब्ध आहेत तर दक्षिण गोव्यात ६० इतकी खाटांची संख्या असून सध्या ४० खाटा उपलब्ध आहेत.

आज दिवसभरात ९६ लोकांनी गृह अलगीकरणाचा पर्याय स्वीकारला तर ४० लोकांना इस्पितळात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आज दिवसभरात दोन हजार तीन इतके लाळेचे नमुने तपासण्यात आले. डिचोली आरोग्य केंद्रात ३३ रुग्ण, पर्वरी आरोग्य केंद्रात १०२ रुग्ण, मये आरोग्य केंद्रात १३ रुग्ण, मडगाव आरोग्य केंद्रात १२० रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्रात १०० रुग्ण उपचार घेत आहेत.

संबंधित बातम्या