Tiger Anwar murder case: पुराव्यांअभावी दोघांची निर्दोष सुटका
Tiger Anwar murder caseDainik Gomantak

Tiger Anwar murder case: पुराव्यांअभावी दोघांची निर्दोष सुटका

सहा महिन्यांपूर्वी भर दिवसा करण्यात आलेल्या खतरनाक गुंड टायगर अन्वर (Tiger Anwar) हल्ल्यामुळे थरार माजला होता.

मडगाव: सहा महिन्यांपूर्वी भर दिवसा करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे ज्या प्रकरणाचा थरार माजला होता, त्या खतरनाक गुंड टायगर अन्वर (Tiger Anwar) खुनी हल्ला प्रकरणातील (murder case) दोन संशयितांच्या विरोधात पोलीस (Goa Police) पुरेसा पुरावा उभा न करू शकल्याने त्यांना आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त करण्यात आले. महेंद्र तानावडे व विजय कार्बोटकर ही निर्दोष मुक्त झालेल्यांची नावे असून याच प्रकरणात केवळ संशयावरून अटक केल्याने विपुल पट्टारी याला पोलिसांनीच आरोपपत्रातून वळगले होते. दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी आज हा निर्णय दिला. या दोन संशयितांच्या वतीने युक्तिवाद करताना ऍड. अमेय प्रभुदेसाई यांनी या दोन्ही संशयिताविरोधात पोलिसांकडे काहीच पुरावा नसल्याचे न्यायालयाच्या लक्षात आणून दिले होते. (Tiger Anwar murder case Two accused acquitted before conviction)

Tiger Anwar murder case
रेड्डी हत्याप्रकरणी मुख्य साक्षीदाराला गोव्यात अटक

16 फेब्रुवारी रोजी दुपारी भर लोकवस्तीत हा हल्ला झाला होता. खंडणी , अपहरण, खुनी हल्ले आदी गुन्ह्यात सामील असलेल्या गुंड अन्वर याचा पाठलाग काही गुंड हातात तलवारी आणि इतर शस्त्रे घेऊन पाठलाग करत असल्याचे पाहून रस्त्यावरील लोक गोरठून गेले होते. हा पाठलाग करताना एका संशयिताने झाडलेली गोळी अन्वरच्या जांघेला लागून तो जखमी झाला होता. मात्र त्याच्या चांगल्या नशिबाने त्याचवेळी तिथून जात असलेल्या एका पोलीस अधीक्षकाने हस्तक्षेप केल्याने अन्वरचा जीव वाचला होता. या प्रकरणात नंतर फातोर्डा पोलिसांनी ड्रग डीलर व्हेली डिकॉस्ता यांच्यासह एकूण 9 संशयितांना अटक केली होती. गुंडांच्या टोळीतील पूर्व वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

Tiger Anwar murder case
गरजवंताना धरले वेठीस, आठवड्याला केवळ ३०० रुपये!

या प्रकरणी आज न्या. डिसिल्वा यांनी मुख्य आरोपी व्हेली डिकॉस्ता याच्यासह रिकी होर्णेकर, सुधन डिसोझा, हर्षानंद सावळ, इम्रान बेपारी व अमीर गवंडी यांच्या विरोधात भा.दं.सं. च्या 143 (बेकायदेशीर जमाव), 147 व 148 (शस्त्रे घेऊन दंगल करणे), 307 (खुनी हल्ला), 120 ब (गुन्हेगारी कारस्थान) यासह 149 (संगनमताने दंगल घडवून आणणे) या कलमाखाली आरोप निश्चित केले या शिवाय अन्वरवर देशी कट्ट्याने गोळी झाडल्याचा आरोप असलेल्या व्हॅलीवर शस्त्रास्त्र कायद्याखाली आरोप निश्चित केला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com