Tiger Census 2022: राज्य वनविभाग गोव्यातील व्याघ्रगणना करण्यासाठी सज्ज

यासंबंधी सराव सुरू करण्याची तारीख निश्चित झाली नसली तरी वन अधिकाऱ्यांनी आधीच व्यापक प्रशिक्षण घेतले आहे.
Tiger Census 2022
Tiger Census 2022Dainik Gomantak

Tiger Census 2022: अखिल भारतीय व्याघ्र मूल्यमापनाचा एक भाग म्हणून, राज्य वनविभाग गोव्यातील जंगलात व्याघ्रगणना 2022 (Tiger Census 2022)करण्यासाठी तयारी करत आहे. यासंबंधी सराव सुरू करण्याची तारीख निश्चित झाली नसली तरी वन अधिकाऱ्यांनी आधीच व्यापक प्रशिक्षण घेतले आहे.

29 जुलै, 2022 रोजी व्याघ्र दिन (Tiger Day Goa) म्हणजेच दर चार वर्षांतून एकदा आयोजित करण्यात येणाऱ्या अखिल भारतीय व्याघ्र गणनेचा अहवाल प्रसिद्ध करण्याचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे.

एका वरिष्ठ वन अधिकार्‍याने (Forest officer) सांगितल्याप्रमाणे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (National Tiger Conservation Authority), भारतीय वन्यजीव संस्था (Wildlife Institute of India) आणि संबंधित राज्य वनविभाग यांच्याद्वारे राबविला जाणारा व्याघ्र अंदाज अभ्यास, कव्हरेज, सॅम्पलिंगची तीव्रता आणि कॅमेरा ट्रॅपिंगचे प्रमाण हा वन्यजीव सर्वेक्षणाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने यापूर्वीच तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रशिक्षण कार्यक्रमात गोव्यातील वन अधिकारी उपस्थित होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी निलगिरीमधील मदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले आहे.

Tiger Census 2022
सोनसोडोवरील सीसीटीव्ही कॅमेरे बदलण्याचा निर्णय

दरम्यान, या जनगणनेची तयारी सुरू असून आम्हाला अजून जनगणनेची तारीख किंवा कालावधी निश्चित करायचा आहे. ते एका आठवड्याच्या आत अंतिम करण्यात येणार असून यात कॅमेरा ट्रॅपिंग पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्थिती मूल्यांकन, वाघांची लोकसंख्या, व्याप्ती, शिकार, सह-भक्षक, अधिवास आणि मानवी प्रभाव यासारखे तपशील प्रदान करते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन 2018 च्या अहवालात 2006 आणि 2010 मध्ये झालेल्या गणनेदरम्यान राज्यात वाघांची उपस्थिती दिसून आली नाही.

2014 मध्ये, स्कॅट डीएनएच्या आधारे एकूण 5 वाघ नोंदवले गेले. 2018 मध्ये अवलंबलेल्या कॅमेरा ट्रॅपिंग पद्धतीत ही संख्या 3वर गेली आहे. त्यामुळे यावर्षीच्या अहवालात राज्यात एकूण किती वाघ आढळून येतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com