बोंडलात होणार मकाऊसह वाघांचं दर्शन

पर्यटकांना पर्वणी: वन खात्याच्या प्रस्तावाला प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी
बोंडलात होणार मकाऊसह वाघांचं दर्शन
Macaw BirdDainik Gomantak

अनिल पाटील

पणजी: देशविदेशातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या बोंडला अभयारण्यात आता अमेरिकन मकाऊ पक्षी आणि दोन वाघांचे दर्शन होणार आहे. यासाठीचा वन विभागाचा प्रस्ताव प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने मंजूर केला असून हे पक्षी आणि प्राणी लवकरच राज्यात दाखल होणार आहे अशी माहिती बोंडला व्यवस्थापक परेश परोब यांनी दिली.

बोंडला हे राज्यातील एकमेव प्राणीसंग्रहालय कम अभयारण्य आहे. येथे विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि उभयचर प्राण्यांना त्यांना नैसर्गिक अधिवासामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. यात गवे, बिबटे, सांबर, चितळ, वन मांजर, अस्वल,

Macaw Bird
झुआरीनगर येथील कारखान्यात स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू

कोल्हे आदींसह सापांच्या काही जाती तर काही विदेशी पक्षी ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत होते. मात्र, कोविड काळात प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात आले. आता प्राणीसंग्रहालय सर्वांसाठी खुले झाले असून पर्यटकांची गर्दी वाढली आहे. सध्या वनखात्याच्या वतीने प्राणीसंग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येत असून प्राण्यांना अधिक नैसर्गिक स्थितीमध्ये ठेवण्यावर भर देण्यात येत आहे. याशिवाय नव्याने काही प्राणी, पक्षी या संग्रहालयात आणण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाला पाठवला असून त्यातील काही प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. आता येणारे मकाऊ पक्षी म्हैसूरच्या प्राणीसंग्रहालयात आणण्यात येत असून वाघांसाठी म्हैसूर बरोबर नागपूर आणि नंदनकानन प्राणीसंग्रहालयामध्ये माहिती घेण्यात आली आहे. हे पक्षी आणि वाघ पावसाळ्यापूर्वी पुढील महिन्याभरात आणण्याचा प्रस्ताव आहे.

Macaw Bird
राज्यातील नेते-अधिकारी विश्‍वजीत यांच्या रडारवर

मानवाची मिमिक्री करणाऱ्या दक्षिण अमेरिकन मकाऊचे आकर्षण

मकाऊ हे पक्षी दक्षिण अमेरिकन असून प्रामुख्याने पेरू, ब्राझील, बोलव्हिया, पनामा या भागात दिसतात. फळे, बिया खाणारे हे पक्षी 70 वर्षांपर्यंत जगू शकतात. मानवाची मिमिक्री करण्यात पटाईत असणारे मकाऊ रंगसंगतीच्या दृष्टीने आकर्षक असतात.

151 जातीचे विविध प्राणी, पक्षी: सध्या बोंडलात 24 जातीचे 103 सस्तनप्राणी आहेत. तसेच सहा प्रजातीचे 24 पक्षी तर 14 जातीचे 24 उभयचर प्राणी या संग्रहालयात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.