प्रियोळात अटीतटीचा तिरंगी सामना

या मतदारसंघात सत्तास्थानी असलेले दिग्गजांचा पराभव झालेला आहे, शिवाय नवख्या उमेदवारांनीही बाजी मारलेली आहे
Priol constituency
Priol constituencyDainik Gomantak

प्रियोळ मतदारसंघनिर्मिती 1989 मध्ये झाली. सात पंचायतीचा समावेश असलेल्या या भागात सुरूवातीपासूनच मगोचे वर्चस्व होते. त्यामुळेच डॉ. काशिनाथ जल्मींनी 1989, 1994 च्या निवडणुकीत मगोचा झेंडा उंचावला, पण 1999, 2002 मध्ये भाजपच्या भाजपचे विश्वास सतरकर विजयी झाले. त्यानंतर पुन्हा मगोकडे 2007, 2012 मध्ये मगोच्या दीपक ढवळीकरांनी मतदारसंघ पुन्हा मगोमय केला.

2017 च्या निवडणुकीत (Election) प्रथमच अपक्ष उमेदवार गोविंद गावडे विजयी झाले आणि मतदारसंघातील मगो, भाजपचे वर्चस्व कमी झाले. पण 2022 च्या निवडणुकीसाठी मात्र या मतदारसंघात दररोज प्रचंड घडामोडी घडत असून दररोज पक्षांतरे होत आहेत. काही कार्यकर्ते, नेते येत्या चार दिवसात कुठे असतील, हे सांगणे कठीण आहे. इतकी अस्वस्थता या मतदारसंघात पसरली असूनही अटीतटीच्या सामन्यात लढत ही तिरंगी होणार आहे.

गेल्या दोन महिन्यात एकमेकांचे बॅनर फाडण्याबरोबरच इतर वादावादी, आरोप-प्रत्यारोप खूप झाले. गोविंद गावडे (Govind Gawde) यांनी विकास कामाचा तपशीलच `हरबोले प्रियोळ प्रगतीपथावर...` या विशेषांकातून जनतेसमोर ठेवला. विकासकामाबाबत कुठेही चर्चेची तयारी दाखवली. केलेल्या कामाबाबत ते आजही ठाम व्यक्त करतात.

Priol constituency
'जिंकून आल्यावर भाजप सरकारला पाठिंबा देणं हाच काँग्रेसचा डीएनए'

झालेला विकास जनतेच्या सहकार्याने केल्याचे सांगतात. पण विरोधक या विकासकातील त्रुटी जाहीरपणे सांगतात. काही ठिकाणी विकासच झाला नसल्याचाही आरोप करतात. फक्त घोषणाबाजी केल्याचा आरोप त्यांच्यावर करतात. गावडे केलेल्या विकासाबद्दल मतदान करण्याचे आवाहन करतात, तर विरोधक प्रियोळचा विकास करण्यासाठी मतदान करा, असे सांगतात. तर काही जण प्रियोळातील स्थानिक उमेदवाराला संधी द्या, स्थानिकच आपल्या समस्या चांगल्याप्रकारे सोडवू शकतात,असे सांगतात.

आरोप, प्रत्यारोपात वाढ

प्रियोळातील प्रचारात आरोप, प्रत्यारोप वाढ झालेली असून चर्चा, संवाद, भाषणबाजीलाही ऊत आला आहे. अवघ्या चार-पाच किलोमिटरच्या अंतरावर एकाच दिवशी प्रचार सभा, भेटी-गाठी सुरू आहेत. सकाळपासून सूर्यास्तापर्यंत उमेदवार किंवा कार्यकर्ते वाडावाड्यावर फिरत आहेत. विकास, नोकऱ्या या मुद्यावरच सर्वांनी रान उठवले आहे. पण नेमका मतदार काय करणार, हे कोणालाच सांगता येणार नाही. कारण या मतदारसंघात सत्तास्थानी असलेले दिग्गजांचा पराभव झालेला आहे, शिवाय नवख्या उमेदवारांनीही बाजी मारलेली आहे.

जल्मी, सतकर, ढवळीकरांचा पराभव होईल, असे कोणालाच वाटले नव्हते. पण प्रियोळच्या सूज्ञ आणि स्वाभिमानी मतदारांनी त्या त्या वेळी बदल घडवलाच. त्यावेळच्या प्रत्येक संस्थेचा, चॅनेलचा, विश्लेषकांचा , तज्ज्ञांचा अंदाज चुकलेला होता. यंदा लढत हीअपक्ष उमेदवार संदीप निगळ्ये, भाजपचे गोविंद गावडे आणि मगोचे दीपक ढवळीकर (Deepak Dhavalikar) यांच्यातच होणार असून या तिघांत कोण दोघे एकमेकांची किती खेचतात, यावर तिसऱ्याचा विजय ठरणार आहे.

...पक्ष प्रवेश सुरूच

या मतदारसंघात एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी गावडे, निगळ्ये, ढवळीकर यांच्या प्रचारसभा, घरोघरी भेटी मोठ्या सुरू आहेत. त्यानंतर आपचे नोनू नाईकांचा प्रचार आहे. पण इतरांच्या सभा, भेटीचे प्रमाणा कमी आहे. अद्याप त्या उमेदवारांची ओळखही मतदारांना झालेली नाही. त्यामुळे तिरंगा लढतीचा निश्चित शक्यता आहे. गेल्या दोन दिवसात इतर पक्षातून मगोत प्रवेश करणाऱ्यांची सख्या वाढली आहे. भोममध्ये दोन वेळा पक्षांतराचा कार्यक्रम झाला, त्यानंतर खांडोळ्यातही काही स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. भाजपने (BJP) या पक्षांतराबाबत ते आपले कार्यकर्ते नव्हेतच, अशी भूमिका घेतली आहे.

Priol constituency
सावित्री जिंकल्या तर भाजपमध्‍ये येणार? बाबू कवळेकरांनी दिल 'हे' उत्तर

मतविभागणीचा फटका

काही भाजप कार्यकर्ते पक्षसोडून निगळ्येंबरोबरच आहेत तर काही गावडे भाजपमध्ये आल्यामुळे त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे मूळची भाजपची एकगट्टा मते विभागली जाणार आहेत. मतविभागणीचा फटकाही बसण्याची शक्यता आहे. शिवाय यातील काही मते दीपक ढवळीकरांकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळेला या मतदारसंघात विजय मिळवणे कोणालाही सोपे नाही. बेभरवशाचे राजकारण जाणवत आहे. मतदारसंघात असलेली अस्वस्थता, अस्थिरता धोकादायक आहे. कारण `करो या मरो`ची स्थिती निर्माण झाल्यामुळे संवेदनशीलते वाढ झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात भांडणे, मारामारीची शक्यताही निर्माण झालेली आहे.

युवा-महिलांचे निर्णायक मत

2017 च्या निवडणुकीत अपक्ष- गोविंद गावडे 15149 मते, मगोप - दीपक ढवळीकर 10463 मते, आप- दत्ताराम देसाई 456 मते, काँग्रेस- (Congress) रामकृष्ण जल्मी 429 मते मिळाली होती. विजयी उमेदवार गावडे भाजपातर्फे रिंगणात आहेत, तर अपक्ष म्हणून मूळ भाजपचे संदीप निगळ्ये आणि मगोचे ढवळीकर पुन्हा शर्यतीत आहेत. इतर कॉंग्रेस, आरजी, आपच्या मतांत उमेदवारांनुसार काहीसा फरक पडेल. तेही विजयासाठी सक्रीय आहेत, पण लढत ही गावडे, निगळ्ये, ढवळीकरांतच होण्याची शक्यता आहे. प्रियोळात 30722 मतदार आहेत, यापैकी ज्येष्ठांचे काही प्रमाणात मतदान झालेही आहे. युवा व महिलांचे मतदानाही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानी प्रियोळकर

मागील निवडणुकीतील मतांचा आकडा, मात्र या निवडणूकीत निश्चितपणे बदलणार आहे. 2017 ची तुलना 2022 शी करता येणार नाही. कारण त्यावेळी भाजपने आपक्ष गावडे यांना पाठिबा दिला होता. आत्ता ते भाजपात असूनही मूळ भाजपच्या निगळ्येंची वेगळी चूल आहे. त्यामुळे प्रत्येकांचे स्थान बदलले असून विचारांतही फरक आहेच. याचाही परिणाम या निवडणुकीत होणार आहे. प्रियोळकर सर्वांच्या प्रचार सभांना जातात, भाषणे ऐकतात, जाहीरनामापत्रेही वाचतात, उमेदवारांचे स्वागतही करतात. पण शेजारच्या मांडवीतून गेल्या पाच वर्षांत बरेच पाणी वाहून गेले आहे. त्या पाण्याचा म्हणजे विकासाच्या गंगेचा विचार मतदार निश्चित करणार आहे. शेवटी ते स्वाभिमानी प्रियोळकर आहेत.

उमेदवार

गोविंद गावडे - भाजप

दिनेश जल्मी - काँग्रेस

दिग्विजय वेलिंगकर – राष्ट्रवादी

पांडुरंग (दीपक) ढवळीकर – मगोप

नोनू नाईक – आप

विश्वेश नाईक – आरजी

दत्ताराम शेटकर – अपक्ष

संदीप निगळ्ये – अपक्ष

मतदासंघ तपशील

बुथ 44

मतदार 30,835

पंचायती - 07

एकूण पंच – 55

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com