Goa Vaccination: उद्यापासून पुन्हा ‘टिका उत्सव’ सुरू

Goa Vaccination: उद्यापासून पुन्हा ‘टिका उत्सव’ सुरू
Pramod Sawant

पणजी: गोवा राज्यात उद्यापासून पालिका व पंचायत पातळीवर 18 वर्षे वयोगटावरील नागरिकांसाठी टिका उत्सव 3 या नावाने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिरे आयोजित करणे सुरु केले जाणार आहे. राज्यात 87 ठिकाणी एकाचवेळी हे लसीकरण केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.(Tika Utsav resume in Goa from tomorrow)

समाज माध्यमांवर जनतेला संबोधित करताना ते म्हणाले, 45 वर्षे वयावरील 75 टक्के लस घेतली आहे. उर्वरीत जणांनी लस घ्यावी. अद्याप केवळ 30 टक्के जणांची लसीची पहिली मात्रा घेतली आहे. कोविडची तिसरी लाट आणि त्या लाटेचा प्रादर्भाव बालके व किशोर वयीन मुले यांना जाणवण्याची शक्यता गृहित धरून स्तनदा माता, सहव्याधी असणारे, 15 वर्षांखालील मुलांचे पालक यांना लसीकरणात प्राधान्य दिले. गेले आठ दिवस अशा लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

ते म्हणाले, 18 वर्षांवरील सर्व वयोगटासाठी रविवारपासून  लसीकरण सुरु केले जाणार आहे. पालिका व पंचायतवार याचे वेळापत्रक निश्चित केले आहे. जनतेने आपल्या पालिकेत व ग्राम पंचायतीत केव्हा लसीकरण आहे हे जाणून घेऊन तेथे जाऊन लस घ्यावी. लस सर्वांना मिळणार असल्याने लस घेण्यासाठी मोठी गर्दी करू नये. प्रत्येक केंद्रावर किती लसी द्याव्‍यात ते ठरवून दिले आहे. त्यामुळे सर्वाना लस मिळेल अशी व्यवस्था केली आहे.  या लसीकरणासाठी कोणतीही पूर्वनोंदणी नाही. आधार कार्ड सोबत नेऊन ही लस घेता येईल.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com