मणेरी-दोडामार्ग येथे 'तिळारी' च्या कालव्याचा फुटला बांध

पाण्याचा (Water) प्रवाह जोराचा असल्याने 50 ते 60 मीटर भरावाचा भाग खाली कोसळला. गोव्यातील (Goa)पाणी पुरवठ्यावर परिणाम.
मणेरी-दोडामार्ग येथे 'तिळारी' च्या कालव्याचा फुटला बांध
दोडामार्ग येथे 'तिळारी'च्या कालव्याला फुटला बांधDainik Gomantak

डिचोली: महाराष्ट्र (Maharashtra)आणि गोवा (Goa) राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारीच्या डाव्या बाजूच्या मुख्य कालव्याला आज पहाटे दोडामार्ग तालुक्यातील धनगरवाडी-मणेरी येथे भगदाड पडले. कालवा फुटल्याने तिळारीतून गोव्यात होणारा पाणीपुरवठा पुन्हा बंद झाला आहे. पावसाळ्यात या कालव्यातून पाणी पुरवठा बंद होता. अलीकडेच कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते.

मणेरी- धनगरवाडी येथे एका नाल्यावर पाईप टाकून त्यावर मातीचा भराव टाकून केलेल्या डाव्या मुख्य कालव्याला भगदाड पडण्याची घटना रविवारी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली. कालव्याला भगदाड पडताच, पाण्याचा जोरदार प्रवाह जवळपासच्या शेती आणि काजू बागायती मध्ये शिरला.

दोडामार्ग येथे 'तिळारी'च्या कालव्याला फुटला बांध
Goa: जागतीक मानसिक आरोग्य दिनानिमित्त बांबोळी येथील मनोरुग्णालयाची भेट

ही घटना समजताच तिळारी प्रकल्पाचे अधिकारी (Project Officer) तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. आणि तातडीने पाणी पुरवठा बंद केला.

मणेरी धनगरवाडी येथे एक लहान नाला आहे. यावर एक मोरी बांधून यावर माती भराव टाकून हा कालवा तयार केला होता. कालव्याला ज्याठिकाणी भगदाड पडले आहे, त्याठिकाणी गळती गळती सुरू होती. स्थानिक शेतकरी आणि केळी,अननस लागवड केलेल्या परप्रांतीय बागायतदारांनी तिळारीच्या संबंधित अभियंत्यांना दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडली. अशी माहिती मिळाली आहे.

दोडामार्ग येथे 'तिळारी'च्या कालव्याला फुटला बांध
Goa: असंघटीत कामगारांना मोठा दिलासा

दहा महिन्यातील दुसरी घटना

गेल्या जानेवारी महिन्यात याच डाव्या बाजूच्या कालव्याला साटेली-भेडशी-खानयाळे येथे भगदाड पडले होते. त्यानंतर आता मणेरी भागात कालव्याला भगदाड पडल्याने कालव्याच्या बांधकामाचा निकृष्ट दर्जा स्पष्ट झाला आहे. तिळारी धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याच्या बांधकामांना अनेक वर्षे झाली आहेत. पण देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने दोन्ही कालवे कमकुवत झाले आहेत. अशी माहिती मिळाली आहे. या कालव्याच्या दुरुस्ती कामावर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र कालव्याला भगदाड पडण्याच्या घटनांमुळे या खर्चाबाबत साशंकता निर्माण होत आहे.

कालव्यातून पाणीपुरवठा बंद

मणेरी येथे कालव्याला भगदाड पडताच मातीचा भराववर वाढलेल्या झाडीसह कोसळत राहिला. पाण्याचा प्रवाह जोराचा असल्याने पन्नास ते साठ मीटर भरावाचा भाग खाली कोसळला. त्यामुळे तिलारीच्या कर्मचाऱ्यांनी कळविल्यानंतर तातडीने पाणी बंद करण्यात आले. पाणी बंद केले तरी सकाळी साधारण दहा वाजेपर्यंत कालव्यातून पाणी सुरु होते. अकरा वाजण्याच्या सुमारास पाणी कमी झाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com