दयानंद सोपटे यांच्यात कार्याला कंटाळून पालये समर्थकांचा 'मगो'त प्रवेश

पालये येथे मगो (MGP) पक्षाचे उमेदवार जित आरोलकर (Jit Arolkar) यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन केल्यानंतर प्रवेश कार्यक्रम आज आयोजित केला.
दयानंद सोपटे यांच्यात कार्याला कंटाळून पालये समर्थकांचा 'मगो'त प्रवेश
पालये समर्थकांचा 'मगो'त प्रवेशDainik Gomantak

मोरजी: मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांच्या कार्याला कंटाळून आणि सरकारी नोकऱ्या भलत्यानाच दिल्याने नाराजी व्यक्त करून भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस सागर तीलवे, माजी सरपंच प्रसाद परब यांच्या नैतृत्वाखाली अनेकांनी मगोत प्रवेश केला.

पालये येथे मगो (MGP) पक्षाचे उमेदवार जित आरोलकर (Jit Arolkar) यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन केल्यानंतर प्रवेश कार्यक्रम आज आयोजित केला. त्यावेळी आमदार दयानंद सोपटे (Dayanand Sopate) यांच्या अनेक समर्थकांनी प्रवेश केला.

पालये समर्थकांचा 'मगो'त प्रवेश
गोव्यात गेल्या 24 तासात 3145 कोविड रुग्ण, पॉझिटिव्ह दर 39.1% वर

कार्यक्रमाला मगोचे नेते राघोबा गावडे, देवेंद्र प्रभुदेसाई,दयानंद मांद्रेकार, माजी सरपंच सुभाष आसोलकर,पंच गुणाजी ठाकूर,पंच प्रवीण व्हायगणकर,उदय मांद्रेकार,आदी उपस्थित होते.

यावेळी सागर तीलवे,प्रसाद परब,सज्जन तीलवे,लाडू तीलवे योगेश तीलवे,कमलाकर परब,चंद्रकांत तीलवे,सुभाष तीलवे,किशोर तीलवे,प्रभाकर तीलवे, आदी व काही प्रमुख महिलांनी यावेळी मगोत प्रवेश केला.

पालये समर्थकांचा 'मगो'त प्रवेश
Goa Corona Crisis: विमान वाहतुकीत प्रवाशांचे प्रमाण घटले!

भाजपाचे (BJP) युवा सरचिटणीस सागर तीलवे यांनी बोलताना जित आरोलकर यांच्या कार्याला आकर्षित होऊन आपण मगोत प्रवेश केला आहे.आमदार दयानंद सोपटे यांना 2017 व 2019 या दोन्ही निवडणुकीत त्यांना विजयी केले .मात्र त्यांच्या कार्यपद्धतीत बदल झाल्याने कंटाळून आपण भाजपा सोडल्याचे सांगितले. ठराविक युवकांना सरकारी देण्याचे धोरण त्यांनी अवलंबले होते ,आता आम्ही पालये गावातून मगोला आघाडी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

माजी सरपंच प्रसाद परब यांनी बोलताना आमचा कोत्या पक्षाकडे रोष नाही,मात्र युवकांची कासम व्हायला हवी होती तशी ती झाली नाही,आणि मगोचे जित आरोलकर यांचे काम करण्याची पद्धत आम्हाला आवडल्याने आम्ही प्रवेश करत असल्याचे सांगितले. मगोचे नेते जित आरोलकर यांनी बोलताना मांद्रे मधून मगोला आता चांगले दिवस येत असून परिवर्तन होणार आहे राज्यात मगोला तृणमूल युतीचे सरकार सत्येवर येणार आहे. सरकार आल्यावर युवकांचे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न असतील ,20 वर्षांनंतर पुन्हा मांद्रे मतदार संघात मगोचा आमदार निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

पालये समर्थकांचा 'मगो'त प्रवेश
विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या कॉन्स्टेबलवर कारवाई करा; एनएसयूआयची मागणी

देवेंद्र प्रभू देसाई यांनी बोलताना जश्या निवडणुका जवळ येत आहे तसतसे अनेक पक्षातील कार्यकरत्ये समर्थक मगो पक्षात येत आहे त्या सर्वांचे आम्ही स्वागत करतो आणि मगोचा आमदार निवडून आणण्याचा निर्धार करतो असे ते म्हणाले. यावेळी दयानंद मांद्रेकार आणि राघोबा गावडे यांची भाषणे झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com