तिसवाडीतील कचरा प्रकल्प तीन तालुक्यासाठी

प्रतिनिधी
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

पणजी महापालिकेच्या मालकीची १ लाख ७१ हजार चौ. मी. जागेत प्रकल्प

पणजी: तिसवाडी तालुक्यात होऊ घातलेल्या २५० मेट्रिक घन मीटर कचरा प्रकल्प केवळ एकाच तालुक्यासाठी नाही, तर इतर तीन  तालुक्यांसाठी महत्त्वाचा  आहे. केवळ आत्तापुरता विचार न करता पुढील ५० वर्षांचा विचार महत्त्वाचा आहे, म्हणूनच त्याकडे पाहिली पाहिजे. पणजी महापालिकेच्या मालकीची १ लाख ७१ हजार चौ. मी. जागा राज्य सरकारने कचरा प्रकल्प उभारणीसाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने २००९ मध्ये  आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर तो प्रकल्प उभारण्यासाठी ज्या गतीने महामंडळाने पावले उचलायला हवी होती, ती झाली नाही. 

साळगावला कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला गेला आणि पणजी महापालिकेचा १० टन, तर ताळगावसह तिसवाडी तालुक्यातील इतर  ग्राम पंचायतींचा कचरा साळगाव कचरा साळगावच्या प्रकल्पात पाठविला जात आहे. 

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पणजी महापालिका कार्यक्षेत्रात दररोज (हॉटेल व्यवसाय नियमीत सुरू होता तेव्हा) ४० टन ओला व सुका कचरा निर्माण होतो. सध्या कोरोनामुळे कचरा निर्मितीत घट झाली आहे.

पणजी शहर जसजसे कूस बदलेल तस तसे येथील कचरा निर्मितीत वाढ होईल. बायंगिणी येथे साळगाव प्रकल्पापेक्षा दुप्पट क्षमतेचा कचरा प्रकल्प उभारला जाणार आहे आणि त्यादृष्टीने महामंडळाने तयारी सुरू केली आहे. पणजी शहरासाठी हा प्रकल्प उपयुक्त नाही, तर तिसवाडी तालुक्यासह फोंडा तालुक्याला फायदेशीर ठरणार आहे. दिवसभरात अडीचशे घन मे.टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. राज्य सरकारकडे सध्याच्या काळात प्रकल्पासाठी २०० कोटी उभारणे अशक्य आहे. त्यामुळे हा प्रकल्प खासगीकरणातून होणार निश्चित आहे. साळगाव प्रकल्प ज्याप्रमाणे चालविला जातो, तसाच हा प्रकल्प चालविला जाईल, हे स्पष्ट आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळात हा प्रकल्प होईल, असे वाटत होते. त्यात अनेक आडकाठ्या येत राहिल्या. न्यायालयाने ही प्रकल्पाची गरज ओळखून २४ महिन्यांत तो उभारण्याची अट घातली आहे. त्यानुसार आमदार बाबूश मोन्सेरात यांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा केल्याने  व गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे मंत्री मायकल लोबो यांनी हा प्रकल्प उभारण्याचे मनावर घेतल्याने प्रकल्प उभारणार हे निश्चित झाले आहे.

कचरा संकलन

 •  २५० मे.टन प्रति दिन           

एकूण कचरा संकलन 

 •   ५० टन सुका कचरा
 •  १५० टन ओला कचरा
 •  ५० टन मिश्रीत कचरा.

या प्रकल्पात काय असू शकते

 •   बायोमिथेनेशन प्रकल्पास गॅस निर्मिती
 •   धातू कंपोस्टिंग विभाग
 •   सॅनेट्री लँडफील
 •   मोबाईल व्हिएकल
 •   कार्यशाळा, प्रशासकीय इमारत
 •   कार्यक्षेत्रात कॅन्टिन, स्वच्छता व स्नानगृह, वैद्यकीय सेवा
 •   प्रयोगशाळा
 •   पाण्याची सोय
 •   आगविरोधी साधनांची उपलब्धता
 •   वाहन पार्किंग, रस्त्यांचे जाळे 
 •   पावसाच्या पाण्याचा निचरा
 •   प्रकल्पाभोवती संरक्षक भिंत

संबंधित बातम्या