डेरेक ओ ब्रायन यांनी घेतली लकी अलींची भेट

गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाचे बघायला मिळतील आश्चर्यकारक परिणाम
डेरेक ओ ब्रायन यांनी घेतली लकी अलींची भेट
Derek O'Brien with Lucky Ali Nafisa Ali Dainik Gomantak

पणजी: पश्चिम बंगालमधील (West Bengal) विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) मोठा विजय मिळवल्यानंतर आता तृणमूल काँग्रेस (TMC) देशातील विविध राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये (Election) भाग घेत आहे आणि बंगालबाहेर पक्षाचा दबदबा निर्माण करण्यात गुंतलेला आहे.

आता टीएमसी विधानसभा निवडणुकीपासून गोव्याच्या राजकारणात (Goa Politics) प्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणूक लढवण्याच्या कयासांमध्ये पक्षाचे राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन गुरुवारी गोवा येथे पोहोचले. डेरेक गोव्यात पोहोचताच टीएमसी पक्ष गोवा विधानसभेची निवडणूक लढवणार अशी अटकळ बांधली जात होती.

Derek O'Brien with Lucky Ali Nafisa Ali
Goa: ‘आप’च्या रॅलीत युवकांचा वरचष्मा

मात्र, 2022 ची विधानसभा निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर डेरेक ओब्रायन यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. गोवा गाठल्यानंतर डेरेक यांनी गायक लकी अली (Lucky Ali) आणि अभिनेता आणि कार्यकर्त्या नफिसा अली (Nafisa Ali) यांच्याशी भेट घेतली. या बैठकीनंतर राज्यात अशी अफवा पसरली की टीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पाहता पक्षात स्टार प्रचारकांना सामील करण्यात व्यस्त आहे.

गोव्यातील इतर पक्षाचे लोक टीएमसीमध्ये सामील होत आहेत, ओ'ब्रायन यांनी सांगितले की, आम्ही केवळ राजकारणीच नव्हे तर इतर सर्व क्षेत्रातील लोकांना भेटत आहोत. गोव्यातील जनता टीएमसीच्या कामाचे कौतुक करत आहेत, त्यामुळे लोक टीएमसीमध्ये सामील होत आहेत.

Derek O'Brien with Lucky Ali Nafisa Ali
गरज पडल्‍यास 40 ही जागा लढवू: चिदंबरम

डेरेक ओब्रायनला भेटल्यानंतर नफीसा अलीने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आणि बॅनर्जींनी गोव्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे अशा मथळ्यासह आनंदही व्यक्त केला. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, "भारताला एका जिवंत नेत्याची गरज आहे आणि याची सुरवात बॅनर्जींनी गोव्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णयाने केली, याचा मला आनंद आहे. गोव्याला एका चांगल्या नेत्याची गरज आहे जो गोव्याच्या भविष्याचा विचार करू शकेल."

दुसरीकडे, प्रसिद्ध गायक लकी अली देखील गोव्यात राहतात. त्याने नुकतेच नव्वदच्या दशकातील आठवणींना उजाळा देत 'ओ सनम' गाणे रिलीज केले आहे. या गाण्याला सोशल मीडियावर चांगली प्रसिद्ध मिळाली होती. टीएमसीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, गोवा निवडणुकांबाबत टीएमसी खूप गंभीर आहे आणि दुर्गा पूजेनंतर अभिषेक बॅनर्जी गोवा दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com