ग्रामीण भागात साधनसुविधा उपलब्ध करणार: गोविंद गावडे

वडावल येथे समाजसभागृह, तर मेणकुरेत जलतरण तलाव उभारणार
ग्रामीण भागात साधनसुविधा उपलब्ध करणार: गोविंद गावडे
Govind GaudeDainik Gomantak

डिचोली: ग्रामीण विकास यंत्रणा खात्यांतर्गत येणाऱ्या डिचोलीतील तीन प्रमुख प्रकल्पांना चालू आर्थिक वर्षात चालना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर क्रीडा मैदानांचा विकास करून युवकांना आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासह मंत्री गोविंद गावडे यांनी आज (गुरुवारी) डिचोली मतदारसंघातील अडवलपाल, मेणकुरे आणि लाटंबार्से पंचायतीला भेट देऊन तेथील क्रीडामैदाने आणि प्रलंबित यावेळी त्यांच्यासमवेत ग्रामीण विकास यंत्रणा तसेच क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारी, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्ये, विविध पंचायतींचे सरपंच, पंच आणि नागरिक उपस्थित होते.

Govind Gaude
म्हापसा पालिकेला विक्रेत्यांचा अल्प प्रतिसाद

लाटंबार्से पंचायतीला भेट दिल्यानंतर सरपंच ज्ञानेश्वर गावस आणि उपसरपंच यशवंत वरक यांनी मंत्री आणि आमदारांचे स्वागत केले. यावेळी पंच कुंदा च्यारी, माजी पंच बबन राणे आदी उपस्थित होते. अडवलपाल पंचायत इमारतीचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही या पंचायतीला भेट दिल्यानंतर मंत्री गावडे यांनी दिले.

प्रलंबित सभागृह होणार

गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील हरिजनवाडा-वडावल येथील सामाजिक सभागृहाच्या कामाला चालना देऊन दलित बांधवांना व्यासपीठ मिळवून देणार असल्याचे मंत्री गावडे यांनी सभागृह बांधण्याचा प्रस्ताव असलेल्या जागेची पाहणी केल्यानंतर सांगितले. जागा उपलब्ध करून दिल्यास लाटंबार्से पंचायतीसाठी नवी सुसज्ज इमारत बांधून देण्याची ग्वाही मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.