कोरोनाचे चोवीस तासांत ७ बळी

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

राज्यात आज दिवसभरात आणखी  ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे राज्यात मृत्यू झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६४१ वर पोचली आहे. आज राज्यात १६९ जणांना कोरोनाची लागण झाली तर १८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पणजी : राज्यात आज दिवसभरात आणखी  ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे राज्यात मृत्यू झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६४१ वर पोचली आहे. आज राज्यात १६९ जणांना कोरोनाची लागण झाली तर १८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यात असणाऱ्या सक्रिय कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन हजार तीनशे छत्तीसवर पोचली आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट ९४.०३ टक्के इतका आहे.  आज ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यामध्ये कुठ्ठाळी येथील ५६ वर्षीय महिला, भटकळ कर्नाटक येथील ६५ वर्षीय पुरुष, कळंगूट येथील ९० वर्षीय पुरुष, म्हापसा येथील ८३ वर्षीय पुरुष, फोंडा येथील ७२ वर्षीय पुरुष, अस्नोडा येथील ६५ वर्षीय पुरुष, म्हापसा येथील ४८ वर्षीय पुरुष, कुठ्ठाळी येथील ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासात १२६३ इतक्या जणांच्या कोरोना पडताळणी चाचण्या करण्यात आल्या. आज १२३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला तर ६० रुग्णांना इस्पितळात भरती करण्यात आले.

संबंधित बातम्या