दक्षिण गोव्यातील ९६ उमेदवारांचे भवितव्य आज होणार सीलबंद

दैनिक गोमन्तक
शनिवार, 12 डिसेंबर 2020

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या २५ पैकी २३ मतदारसंघातील ९६ उमेदवारांचे भवितव्य आज सीलबंद होणार आहे.

मडगाव:  दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या २५ पैकी २३ मतदारसंघातील ९६ उमेदवारांचे भवितव्य आज सीलबंद होणार आहे. यात आजी - माजी जिल्हा पंचायत सदस्यांसह, माजी सरपंचांचाही समावेश आहे. रिवण, खोला व बोरी या तीन मतदारसंघांत सर्वाधिक (प्रत्येकी ७) उमेदवार आहेत. तर उसगाव गांजे व पैंगीण मतदारसंघांत प्रत्येकी 2 उमेदवार असल्याने या मतदारसंघांत थेट लढती होणार आहेत. 

विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांपैकी उल्हास तुयेकर, सुवर्णा प्रभू तेंडुलकर, खुशाली वेळीप, शाणू वेळीप, दीपक नाईक बोरकर, आतोन वाझ तर माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप देसाई, अॅंथनी रॉड्रिग्ज, नारायण कामत, डॉमनिक गावकर हे रिंगणात आहेत. महिलांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघांत काही आजी व माजी जिल्हा पंचायत सदस्यांनी आपल्या पत्नीना रिंगणात उतरवले आहे. 

  साकवाळ मतदारसंघात भाजपच्या अनिता थोरात बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर एका उमेदवाराचे निधन झाल्याने नावेली मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे

 
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या 23 मतदारसंघांतील उमेदवार पुढील प्रमाणे ः  उसगाव गांजे - मुकुंद गावडे (कॉंग्रेस). उमाकांत गावडे (भाजप)
बेतकी-खांडोळा - नोनू नाईक (अपक्ष), श्रमेश भोसले (भाजप), विश्वजीत नाईक (मगो), कुर्टी - प्राची नाईक (कॉंग्रेस), प्रिया च्यारी (मगो). संजना नाईक (भाजप),  वेलींग प्रियोळ - दामोदर नाईक (मगो), समीर नाईक (अपक्ष), शैलेश नाईक (अपक्ष), शिवराम  नाईक. कवळे - गणपत नाईक (मगो), गुरुदास नाईक (अपक्ष), जयराज नाईक (भाजप), प्रकाश नाईक (अपक्ष), सुदेश भिंगी (अपक्ष) बोरी -  बाबुराव सालेलकर (मगो), दिनेश बोरकर (आप), दीपक नाईक बोरकर (भाजप) ज्ञानेश्वर खांडेपारकर (अपक्ष), कुमुद गावडे (अपक्ष), पुनम सामंत (अपक्ष), विठ्ठल बोरकर (अपक्ष),  शिरोडा -  ज्योकीम गोम्स (अपक्ष), मानुएल क्रुझ (मगो), नारायण कामत (भाजप), रिचर्डसन कुलासो (आप). 

आणखी वाचा:

गोवा जिल्हा पंचायत निवडणुका भाजप आणि काँग्रेस यांना धडा शिकवण्यासाठीच -

दवर्ली  -  उल्हास तुयेकर (भाजप), अब्दुल शेख (अपक्ष), फ्लोरिय़ानो फर्नांडिस (अपक्ष), मुर्तुजा कुकनुर (कॉग्रेस) प्रदीप वेर्लेकर (अपक्ष), सुकुर गोम्स (अपक्ष)
राय -  जोजफ वाझ (काँग्रेस), क्रूझ परेरा (अपक्ष), डॉमनिक गावकर (अपक्ष),  लियांड्रिना गोम्स (आप), नुवे - ब्रिझी बारेटो (अपक्ष),असुसियाना रॉड्रिग्ज (काँग्रेस) आणि मार्सेलीना कुलासो (आप) , कोलवा - सुझी फर्नांडिस (काँग्रेस), एश्र्वर्या फर्नांडिस (आप) आणि वानीया बाप्तिस्त (राष्ट्रवादी काँग्रेस), बाणवली -  मिनिन फर्नांडिस (राष्ट्रवादी काँग्रेस), रॉयला फर्नांडिस (काँग्रेस) आणि हेंझल फर्नांडिस (आप), वेळळी - जोन्स सिल्वा (अपक्ष), ज्युलियो फर्नांडिस (काँग्रेस), अॅंथनी रॉड्रीग्ज (अपक्ष), राफेल कार्दोझ (अपक्ष), सप्निल झाटेकर (अपक्ष) ताउमार्तुग रॉड्रिग्ज (अपक्ष) , 

गोवा राज्य सरकार आणखी १०० कोटींचे  कर्जरोखे घेणार -

गिरदोली - रुदोल्फिना वाझ (आप), संजना वेळीप (भाजप), सोनिया फर्नांडिस (कॉग्रेस), कुडतरी - मिशेल रिबेलो (कॉग्रेस), ब्रिंडा सिल्वा (आप), सरिता फर्नांडिस (राष्ट्रवादी काँग्रेस), अॅन्ड्रीया फर्नांडिस (अपक्ष). सावर्डे - प्रदीप देसाई (मगो), राहुल शेटवे (अपक्ष), श्याम भंडारी (कॉंग्रेस), सिद्धार्थ पाटील (आप), सुवर्णा प्रभू तेंडुलकर (भाजप), धारबांदोडा - प्रियांका देसाई (अपक्ष), सपना वेळीप (अपक्ष), सुधा गावकर (भाजप), विंदा सावंत (मगो), रिवण -  अभिजित देसाई (कॉंग्रेस), गजानन रायकर (अपक्ष), जोशिनो डिकॉस्ता (अपक्ष), रुपेश गावकर (मगो), संदीप नाईक (आप), सुधाकर गावकर (अपक्ष), सुरेश केपेकर (भाजप),  शेल्डे - हर्षद गावस देसाई (कॉंग्रेस), सिद्धार्थ गावस देसाई (भाजप), वेलरॉयड मास्कारेन्हस (आप),  बार्से - दिनेश गावकर (अपक्ष), खुशाली वेळीप (भाजप), मालू वेळीप (अपक्ष), मंगेश देविदास (मगो), संदेश गावकर (अपक्ष) खोला - आतोनियो बोर्जीस (आप), दयानंद फळदेसाई (अपक्ष), दिलखुश वेळीप (अपक्ष), गुरु वेळीप (अपक्ष), प्रवीण प्रभुदेसाई (अपक्ष), राजेश वेळीप (कॉंग्रेस), शाणू वेळीप (भाजप). पैंगीण - रेश्मा वेळीप (कॉंग्रेस),शोभना वेळीप (भाजप), साकवाळ - बिनविरोध - अनिता थोरात (भाजप) कुठ्ठाळी - आतोन वाझ (अपक्ष), लोपिनो झेवियर (कॉंग्रेस), पोब्र जीझस वाझ (आप)

संबंधित बातम्या