महाराष्ट्राच्या धर्तीवरील आघाडी गोव्यातही आकाराला आणली जाणार काय?

दैनिक गोमंतक
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

शिवसेनेने नवे कार्यालय येथील सुशिला बिल्डिंगमध्ये सुरू केले आहे. मध्यंतरी शिवसेनेचे खासदार संजय राऊत गोव्यात फार सक्रिय होते.

पणजी ; शिवसेनेने नवे कार्यालय येथील सुशिला बिल्डिंगमध्ये सुरू केले आहे. मध्यंतरी शिवसेनेचे खासदार संजय राऊत गोव्यात फार सक्रिय होते. महाराष्ट्रातील राजकारणाने गती घेतल्यानंतर ते गोव्यात फिरकलेले नाहीत.
गोवा सुरक्षा मंचसोबत आघाडी करण्याचे शिवसेनेचे पूर्वी प्रयत्न होते.

आता भाजपविरोधी पक्षांची मोट बांधली जात असताना त्यात समन्वयकाची भूमिका राऊत बजावणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना ही किमान समान कार्यक्रमांवर आधारीत महाराष्ट्राच्या धर्तीवरील आघाडी गोव्यातही आकाराला आणली जाणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिवसेनेच्या या नव्या कार्यालयाचे उद्‍घाटन आज रविवारी सकाळी १० वाजता करण्यात येणार असून यानिमित्ताने विष्णू पुजेचे आयोजनही करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या