तीन दिवस चालणाऱ्या साखळीच्या दीपावली बाजाराला आजपासून सुरूवात

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

आजपासून साखळी येथे ‘दीपावली बाजार’चे आयोजन केले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बाजारचे उद्‍घाटन साखळीच्या नगरसेविका तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्य शुभदा सावईकर यांच्या हस्ते व स्थानिक सरपंच श्रीमती कवळेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

साखळी: आजपासून साखळी येथे ‘दीपावली बाजार’चे आयोजन केले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बाजारचे उद्‍घाटन साखळीच्या नगरसेविका तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्य शुभदा सावईकर यांच्या हस्ते व स्थानिक सरपंच श्रीमती कवळेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या प्रदर्शन तथा विक्रीमध्ये विविध प्रकारचे आकाश कंदील दिवाळीनिमित्त लागणाऱ्या पणत्या तसेच अनेक मातीची भांडी शिवाय फराळाचे विविध प्रकार, मिठाई, कपडे, तोरणे आयुर्वेदिक साबण तसेच विविध प्रकारची आयुर्वेदिक उत्पादने इत्यादी अनेक याठिकाणी विक्रीस उपलब्ध असतील या प्रदर्शन तसेच विक्रीचे उद्‍घाटन शुक्रवारी  सकाळी दहा वाजता वेदमूर्ती घनश्याम शास्त्री जावडेकर सभागृह विठ्ठलापूर साखळी येथे होणार आहे. प्रदर्शन स.१० ते सायं. ८ वा. रविवार ८ नोव्हेंबर पर्यंत चालेल.

संबंधित बातम्या